खळबळजनक..बहिण-भावाचा निघून खून, संशयिताला १० तासात घेतले ताब्यात; कारण वाचून बसेल धक्का
आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील निंभोरे (ता. फलटण) येथे सुमित तुकाराम शिंदे (वय २०) व
शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके (वय ३५) या बहीण-भावाचा निर्घृन खून करण्यात आला.
या दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या मुसक्या ग्रामीण पोलिसांनी केवळ दहा तासांमध्येच आवळल्या.
सातारा : आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील निंभोरे (ता. फलटण) येथे सुमित तुकाराम शिंदे (वय २०) व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके (वय ३५)
या बहीण-भावाचा निर्घृन खून करण्यात आला. या दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या मुसक्या ग्रामीण पोलिसांनी केवळ दहा तासांमध्येच आवळल्या.
चारित्र्याच्या संशयावरून हे खून केल्याचे तपासात समोर आले असून, या प्रकरणातील संशयित रणजित मोहन फाळके, (मुळगाव सातारारोड, ता. कोरेगाव) याला पोलिसांनी अटक केली.
निंभोरे येथे पालखी महामार्गापासून सुमारे शंभर फूटावर असलेल्या झोपडीवजा घरात सुमित हे त्यांच्या आई-वडिलांसमवेत राहत होते.
त्यांच्या समवेतच शीतल व रणजित फाळके हे पती-पत्नी राहत होते. शनिवार, दि. २५ रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास सुमित व शीतल यांचे मृतदेह आढळून
आल्याने व त्यांचा शस्त्राने वार करून निर्घूण खून केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ माजली होती.या घटनेची माहिती मिळताच
पोलीस उपअधीक्षक राहुल धस, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा तपास व चौकशी करीत
असताना मृत शीतल हिने दोन वर्षापूर्वी पहिला नवरा कनवऱ्या भीमऱ्या पवार (रा. वाळवा, जि. सांगली) याला सोडून दिले होते व त्यानंतर ती रणजित फाळके याच्यासोबत
निंभोरे येथे तिच्या आई, वडिलांजवळ त्यांच्या झोपडीतच राहत होती. घटना घडली त्या रात्री रणजित फाळके हा त्यांच्यासोबतच झोपडीत झोपला होता.
सकाळी मृतदेह मिळाल्यानंतरही तो तिथेच फिरत होता, परंतु घटनास्थळावर पोलीस येताच तो पसार झाला होता.
संशयातून केला खून, पोलिसांकडून अटकपोलिसांनी कसून तपास करत मोबाईल लोकेशच्या आधारे त्यास सातारारोड येथून त्याला ताब्यात घेतले, त्याची कसून चौकशी केली
असता त्याने दिनांक २५ मे रोजी मध्यरात्री शीतल ही झोपेतून उठून पुरुषाबरोबर कोठे तरी जात असल्याचे दिसल्यामुळे मी झोपडीतील चाकू घेऊन तिच्या मागोमाग गेलो.
काही अंतरावर गेल्यानंतर शीतलला गाठुन मी तिच्या छातीवर चाकू खुपसून तिचा खून केला. त्यावेळी तिच्यासोबत असलेला तिचा भाऊ सुमित तुकाराम शिंदे याला मी अंधारात
न ओळखल्यामुळे तो एक पुरुष असल्याचे समजून मी त्याच्याही छातीत चाकू खुपसून त्याचाही निघृण खून केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी फाळके याला अटक केली आहे.
0 Comments