google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी घटना... पुणे-सातारा महामार्गावर अपघात : अपघातात पलूस येथील विवाहतेचा जागीच मृत्यू तर, पती गंभीर जखमी

Breaking News

दुर्दैवी घटना... पुणे-सातारा महामार्गावर अपघात : अपघातात पलूस येथील विवाहतेचा जागीच मृत्यू तर, पती गंभीर जखमी

दुर्दैवी घटना... पुणे-सातारा महामार्गावर अपघात : अपघातात पलूस येथील विवाहतेचा जागीच मृत्यू तर, पती गंभीर जखमी


सातारा : सुट्टीसाठी गावी जाणाऱ्या पती-पत्नीच्या दुचाकीला डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती जखमी झाला. 

अपघातानंतर डंपर चालकाने तेथून पलायन केले आहे. सदरचा अपघातात हा पुणे-सातारा महामार्गावर शिवरे (ता. भोर) गावच्या हद्दीत गुरुवारी (दि.९) रोजी अपघात घडला.

सोनाली महेश साठे (वय २३) असे या अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे.

 पती महेश बाळू साठे (वय २८, रा. दोघेही रा. सध्या रा. गजानननगर, फुरसंगी, पुणे तर मूळ रा.बांबवडे, ता. पलूस, जि. सांगली) हा जखमी झाला आहे. 

याप्रकरणी महेश साठे यांनी राजगड पोलिस ठाणे, नसरापूर येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धडक देऊन पसार झालेल्या डंपरचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात कामाला असणारे महेश आणि सोनाली हे दोघे गुरुवारी सकाळी त्यांचे मूळ गाव बांबवडेला दुचाकी

 (एमएच १० डीयू ७५५९) वरून जात होते. पुणे-सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हद्दीत त्यांना पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने (एमएच १२ व्हीटी ८६८९) जोरात धडक दिली. 

यामध्ये रस्त्यावर पडलेल्या सोनालीच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर महेश जखमी झाला. या प्रकरणी राजगड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments