धक्कादायक ...शिवी दिल्याच्या रागातून मित्राची पोटात चाकू खुपसून हत्या भयंकर कांड
शिवीगाळ केल्याच्या रागातून चार जणांनी मिळून आपल्याच मित्राची हत्या केल्याची
धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्राच्या आईला शिवीगाळ केल्याच्या वादातून चार मित्रांनी मिळून आपल्याच एका २० वर्षीय मित्राची पोटात चाकू खुपसून हत्या केली.
अतुल बाबासाहेब खाडे असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल कळकुंबे आणि रोहन बनकर, वैभव उगले, सुशांत उपदेशी आणि सागर जाधव असे मारेकऱ्यांचे नाव आहे.
त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मारेकरी विशालची आई अतुलसोबत फिरू नको म्हणत मुलाला खडसावताना अतुललाही रागावली होती.
त्यामुळे अतुलचा विशालवर प्रचंड राग होता. याच रागातून अतुलने विशालच्या आईला फोन करून शिवीगाळ केली. त्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरू झाला.
हा वाद मिटवण्याचा बहाणा करून विशालने अतुलची भेट घेतली. अतुलला मिठी मारून पोटात चाकू खुपसला. यात अतुलचा मृत्यू झाला.
0 Comments