google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान करणाऱ्या झाकीर नाईक यांच्यावर कठोर कारवाई करावी सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर

Breaking News

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान करणाऱ्या झाकीर नाईक यांच्यावर कठोर कारवाई करावी सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर

 हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान करणाऱ्या झाकीर नाईक यांच्यावर कठोर कारवाई करावी


सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर

सांगोला (जिल्हा सोलापूर) - मंदिर वा  चर्च यांमध्ये जाण्यापेक्षा हजारोंना मारणाऱ्या शस्त्रे बनवणाऱ्या कारखान्यात जाणे चांगले असे धार्मिक भावना दुखावणारे विधान करणाऱ्या झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करावी, 

अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सांगोला येथे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी विकास गावडे, श्रीकांत चव्हाण, संतोष पाटणे सर उपस्थित होते.

 केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांच्या नावे हे निवेदन देण्यात आले आहे.

 या निवेदनात पुढे म्हटले आहे की भारतासह अन्य देशांमध्ये आतंकवाद्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी भारत सरकारला हवा असलेला डॉक्टर झाकीर नाईक यांनी 

पुन्हा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य केली आहेत मोहम्मद झीशान नामक मुसलमान युवक झाकीर नाईकला पुढील लेखी प्रश्न पाठवतो 

प्रश्न - मला यु.ए.ई. मध्ये नोकरी मिळाली आहे पण नंतर समजले की ती कंपनी मंदिर बनवण्याचे काम करते तरी मी हे काम करणे योग्य आहे का ? की मी माझ्याकडून शिर्क

 ( अल्लाह शिवाय अन्य कोणत्याही देवतेला मानणे किंवा अल्लाहच्या समान मानणे हे पाप) होईल आणि मला त्याचे परिणाम भोगावे लागतील का?  कृपया मला मार्गदर्शन करा मला 

अल्लाहच्या विरोधात जायचे नाही हुडा टीव्ही नावाच्या यूट्यूब चैनल वर झाकीर नाईक याचा हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे या प्रश्नाचे उत्तर कुराणचा संदर्भ देत झाकीर नाईक देताना म्हणतो, 

1.  तुम्ही चांगले काम करण्यासाठी कोणाला सहाय्य केले तर अल्लाहला ते चालते पण तुम्ही कोणाच्या पापा मध्ये सहभाग घेतलेला अल्लाहला मान्य नाही मंदिराच्या कामात सहभाग हे शिर्क आहे अर्थात इस्लामनुसार महापाप आहे. 

2.  हे असे म्हणण्यासारखे आहे की, मी दारूच्या दुकानात कामाला जातो मला पाप लागेल का ? मी ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीत काम करतो मला पाप लागेल का ? 

अर्थातच दारूच्या दुकानात काम करणे किंवा ड्रग्स बनवणाऱ्या सोबत काम करणे

 हे पापच आहे पण यापेक्षाही भयंकर पाप मंदिर बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्याला लागते कारण इस्लाम मध्ये शिर्क हे सर्वात मोठे पाप मानले गेले आहे. 

3. म्हणून तुम्ही कोणत्याही मंदिर किंवा चर्च बनवणाऱ्या कंपनीत काम करणे हे इस्लामनुसार हराम आहे खूप मोठे महापाप आहे त्यामुळे तुम्हाला निश्चितच ते भोगावे लागेल.

4.  त्यामुळे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो की तुम्ही हे हराम असलेले काम करू नये काही मुसलमान धार्मिक नेते आणि राजकारणी सेक्युलर

 असल्याचे दाखवण्यासाठी मंदिराच्या उद्घाटनाला जातात ते दुसरे काही करत नसून महापापात सहभागी होत आहेत. 

5. मंदिर किंवा चर्च यांच्या उद्घाटनाला जाण्यापेक्षा एखाद्या एखादा राजकारणी हजारो निष्पाप नागरिकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांची शस्त्रे

 बनवून देणाऱ्या कारखान्याच्या उद्घाटनाला गेला हे निश्चित अधिक चांगले आहे कारण मंदिर किंवा चर्च येथे शिर्क केले जाते. शिर्क हे इस्लामनुसार महापाप आहे. 

6. अल्लाहने स्पष्टपणे म्हटले आहे की मी कोणालाही माफ करू शकतो पण शिर्क केलेल्याला कधीही माफ करत नाही

 तो कधीही माफ करणार नाही त्यामुळे तू हे काम घेऊ नको अल्लाह तुझी परीक्षा घेत आहे अल्लाह तुला यापेक्षाही चांगले हलाल काम देईल.

 अशी अतिशय भयानक आणि अत्यंत विखारी विधाने करत झाकीर नाईक यांनी पुन्हा एकदा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. 

झाकीर नाईक हा इस्लामी धर्मोपदेशक असल्यामुळे त्याच्या भाषणातून जगभरातील धर्मांध मुसलमान प्रेरणा घेतात.

 वरील प्रकारचे वक्तव्य करून मुसलमानांना हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या विरोधात भडकावत जाणीवपूर्वक धार्मिक तेढ, घृणा, द्वेष, मत्सर आणि शत्रुत्व निर्माण करत आहे. या संदर्भात आम्ही मागणी करत आहोत की,

 1. झाकीर नाईक याला भारताच्या स्वाधीन करावे अथवा मलेशियात त्याच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी केंद्र सरकारने मलेशिया सरकारवर दबाव आणावा.

 2. संयुक्त राष्ट्रसंघात झाकीर नाईकला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी मागणी करावी. 

3. फरार दहशतवादी घोषित करून त्याच्या संघटनेवर बंदी आणली गेली असूनही झाकिर नाईक याच्या भाषणाचा प्रसार करणारी 50 हून अधिक फेसबुक अकाउंट, ट्विटर अकाउंट आजही भारतात राजरोसपणे चालू आहेत

 बंदी घातलेल्या संस्थेचा व संबंधित व्यक्तीचा प्रसार करणे हे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा 1967 अंतर्गत कलम 13 (1) (a )(b), (2) आणि (3) नुसार दंडनीय गुन्हे आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे 

की झाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशन यांचे फेसबुक ट्विटर instagram आधी सर्व सामाजिक माध्यमांवरील सर्व अकाउंट त्वरित बंद करण्यात यावीत. 

4. ही सोशल मीडिया अकाउंट इतकी वर्ष का बंद करण्यात आली नाहीत, त्याला कोण जबाबदार आहे ? त्या व्यक्ती आणि फेसबुक सारख्या कंपन्या यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करावी.

Post a Comment

0 Comments