धक्कादायक.. दिप्तीच्या मोबाइलवर कामाचा ई-मेल आला...
बँकेमध्ये अधिकारी असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत डॉक्टर पतीने आईवडिलांच्या मदतीने तिची हत्या केली.
इतकेच नव्हे तर महिलेचा मृतदेह फासावर लटकवून तिने आत्महत्येचा बनावही आरोपींनी रचला.
पण सत्य फार काळ लपून राहिले नाही. याप्रकरणी डॉक्टर पती, सासू-सारे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावतीतील अर्जुननगर परिसरामध्ये घडलेल्या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. दिप्ती चेतन सोळंके (वय 34 वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
दिप्तीच्या हत्येप्रकरणी पती डॉ. चेतन ज्ञानदेव सोळंके (वय 36 वर्षे), सासरे ज्ञानदेव सोळंकेसह सासूलाही अटक करण्यात आली आहे.
चेतन हा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापड वाढोना येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहे. लग्न झाल्यापासून चेतन दिप्तीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सासू-सासरेदेखील त्याला प्रोत्साहन देत होते.
पण 24 मे रोजी या संशयाने टोक गाठले आणि या सर्वांनी मिळून दिप्तीचा जीव घेतला. दिप्तीची हत्या करून आरोपींनी तिने आत्महत्या केल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
लेकीने आत्महत्या केल्याचा निरोप दिप्तीचे वडील रामभाऊ राठोड यांना 25 मे रोजी मिळाला. पण यावर त्यांनी हत्येचा संशय व्यक्त करत पोलिसात तक्रार दाखल केली.
अखेर शवविच्छेदन अहवालामध्ये जबर मारहाण झाल्याने दिप्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आणि आरोपींचे बिंग फुटले.
दिप्ती ही दर्यापूरमधील एका प्रतिष्ठित बँकेमध्ये ज्युनिअर असोसिएट पदावर कार्यरत होती. 23 मे रोजी सुटी असल्याने बुधवारी संध्याकाळी ती दर्यापूरहून सासरी आली. याच सुमारास तिच्या मोबाइलवर कामाचा ई-मेल आला.
यावरून पतीने पुन्हा दिप्तीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. हा बँकेतील सहकाऱ्यांसोबत मौजमस्ती करण्याचा प्लान असल्याचे म्हणत
पती, सासू-सासऱ्यांनी तिचा छळ केला. घडलेल्या प्रकाराची माहिती तिने वडिलांना सांगितली. यानंतर तिच्या मृत्यूचीच बातमी आल्याचे राठोड यांनी तक्रारीत म्हटले आहे.
0 Comments