google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ...पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला

Breaking News

धक्कादायक ...पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला

धक्कादायक ...पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला


राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान मुंबईला काल अचानक आलेल्या पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामध्ये अक्षरशः आभाळ कोसळले आणि मुंबई हादरली.

 त्यात वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याने घडलेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 74 लोकांना वाचविण्यात आले आहे.

 त्यात ओळख पटलेल्या मृतांमध्ये एका 24 वर्षीय तरूणाचा करूण अंत झाला. यामध्ये ओळख पटलेल्या मृतांमध्ये 24 वर्षीय भरत राठोड या तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

तो मेडिकलमध्ये डिलिव्हरीचा काम करत होता. या दरम्यान पेट्रोल भरण्यासाठी या पेट्रोल पंपवर तो गेला असताना हे भले मोठे होर्डिंग वादळाने कोसळले 

अन् त्याच्यावर अनपेक्षितपणे काळाने घाला घातला. तो घाटकोपर पश्चिममधील गोळीबार रोड परिसरातील रहिवासी आहे.

 त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरात कमावणारा तो एकटाच होता. कोरोनामध्ये त्याच्या आईचे निधन झाले होते.

 तर नुकतेच त्याचे वडील आजारपणातून बाहेर पडले होते. मात्र या दुर्घटनेमध्ये त्याच्या कुटुंबावर मोठे संकट ओढावले. त्यांचा एकमेव आधार या कुटुंबाने गमावला आहे.

Post a Comment

0 Comments