सांगोला तालुक्यात वादळी वारे व पावसामुळे जुजारपुर, जवळा, आलेगाव, डोंगरगावात घरावरील पत्रे गेले उडून
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- वादळी वारे व पाऊसामुळे सांगोला तालुक्यातील जुजारपूर, जवळा, आलेगाव, डोंगरगाव गावात २१ मे रोजी रात्रीच्या सुमारास
अनेक घरावरील पत्रे उडून जावून अनेक घरांचे, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊसामुळे व वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
दि.२१ मे रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आलेल्या मौजे जुजारपूर येथील दगडू हरिबा खडके असलेल्या राहत्या घराचे पत्रे उचकटून उडून गेले.
जुजारपुर गावातील तुकाराम विठ्ठल पाटील यांचे गाईचा गोठा पडला असून एक जर्सी गाई जखमी झाली आहे.आलेगाव गावात नामदेव विठोबा राऊत यांचे कौलारू घराची पडझड झाली आहे.
आलेगाव येथील अंकुश आबा लवटे यांचे घराची पडझड झाली असून पत्रे उडून गेले आणि एका गायीच्या पायाला दुखापत झाली आहे.
मानेगाव येथील दत्तात्रय बाबर यांच्या घरानजिक झाड पडून म्हैस मयत झाली.
जवळा येथे नुकसान झाले असून श्री. दिगंबर धुमाळ यांच्या जनावराच्या शेड वरती झाड पडून चार पत्रे बाद झाले. तरंगेवाडी येथील श्रीमती नंदा होनकट्टे यांच्या राहते घरावरती झाड पडून चार पत्रे बाद झाले.
भागीरथी साळुंखे यांच्या राहत्या घरा वरती झाड पडून चार पत्रे बाद झाले व भिंत चिरली आहे. पांडुरंग साळुंखे यांच्या राहत्या घरा वरती झाड पडून चार पत्रे बाद झाले व भिंत चिरली.
जालिंदर धुमाळ यांच्या राहत्या घराचे १२ पत्रे वादळ वाऱ्याने उडून गेले. नवनाथ परशुराम धुमाळ यांच्या राहत्या घराचे १२ पत्रे वादळ वाऱ्याने उडून गेले.
ईश्वर कर्णवर यांच्या कौलारू घराचे तीनशे कवले उडून फुटले. ज्ञानू रामा गावडे यांच्या शेळ्यांचे पत्रा शेडचे ६ पत्रे वादळ वाऱ्याने उडून गेले. बाबासाहेब मुजावर शेळ्याचा पत्रा शेड उडून सहा पत्रे पडले आहेत.
साहिल इनामदार यांचे पत्रा शेड वरील प्लास्टिक पत्रा झाडाची फांदी पडून फुटला तर चंद्रकांत विष्णू वाघ राहत्या घराजवळील बाथरूमवर झाड पडून भिंत पडली आहे.
डोंगरगाव येथे श्रीपती नाना राजगे असलेल्या राहत्या घराचे पत्रे उचकटून निघाले. श्री अशोक फोंडे यांचे राहत्या घराचे पत्रे उचकटून निघाले तसेच संपूर्ण घर उपयोगी वस्तू नुकसान व उडून नुकसान झाले आहे.
भगवान फोंडे असलेल्या राहत्या घराचे पत्रे व कवले तसेच जनावरांचा शेडचे पत्रे उचकटून निघाले. पांडुरंग फोंडे असलेल्या राहत्या घराचे पत्रे उचकटून निघाले व उडून गेल्याने नुकसान झाले आहे.
श्रीमती चिंगूबाई शामराव देवकते असलेल्या राहत्या घराचे पत्रे उचकटून निघाले तसेच संपूर्ण घर उपयोगी वस्तू नुकसान झाले आहे.
श्री किसन फोंडे असलेल्या राहत्या घराचे पत्रे उचकटून निघाले व उडून गेल्याने नुकसान झाले आहे.
श्री.बाळासाहेब उतळे यांचे जनावरांचे पत्रा शेडचे संपूर्ण पत्रे उचकटून निघाले व उडून गेल्याने नुकसान झाले आहे. श्री. तात्यासो बाबर यांचे घराचे व जनावरांचे पत्रा शेडचे संपूर्ण पत्रे उचकटून निघाले.
श्री. सिद्धेश्वर खंडागळे यांचे जनावरांचे पत्रा शेडचे संपूर्ण पत्रे उचकटून निघाले.
श्री सुभाष आनंदा किरकत यांचे जनावरांचे पत्रा शेडची संपूर्ण सिमेंट भिंत कोसळली आहे. श्री विठ्ठल बाबर यांचे घराचे संपूर्ण पत्रे उडाले आहे.
श्री शिवाजी शिंदे यांचे छप्पर घराचे व स्वयंपाक उपयोगी भांडयाचे नुकसान तर श्री. दिनकर कोडक यांचे सिमेंट बांधकाम पत्राच्या खोल्या व स्वयंपाक उपयोगी भांडी तसेच जनावरांचे पत्रा शेड उडाले आहे.
महसूल प्रशासनाकडून संबंधीत गावातील नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करुन तहसीलदार संतोष कणसे यांच्याकडे अहवाल सादर केला आहे.
0 Comments