google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक बातमी..शिक्षक आमदाराच्या भावाच्या कारचा भीषण अपघात

Breaking News

धक्कादायक बातमी..शिक्षक आमदाराच्या भावाच्या कारचा भीषण अपघात

धक्कादायक बातमी..शिक्षक आमदाराच्या भावाच्या कारचा भीषण अपघात


राज्यात मोठा अपघात झाला आहे. अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. 

अकोल्यातील पातूरमधील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जण ठार झाले. तर काही जण गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये सरनाईक कुटुंबातील 3 सदस्यांचा मृत्यू झाला.

  अमरावतीमधील शिक्षक मतदारसंघातील आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. वाशिमवरून अकोल्याकडे जात होते. 

त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी गाडी धडकली. या अपघातात रघुवीर अरुण सरनाईक (२८), अस्मिता अजिंक्य आमले (९), शिवानी अजिंक्य आमले (३०), सिद्धार्थ यशवंत इंगळे (३५), अमोल शंकर ठाकरे (३५), कपिल प्रकाश इंगळे यांचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments