google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...दारु पिऊन आईला शिवीगाळ केल्याचा राग, मित्रांनी केलेल्या जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू; सोलापूर हादरलं

Breaking News

खळबळजनक...दारु पिऊन आईला शिवीगाळ केल्याचा राग, मित्रांनी केलेल्या जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू; सोलापूर हादरलं


खळबळजनक...दारु पिऊन आईला शिवीगाळ केल्याचा राग, मित्रांनी केलेल्या जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू; सोलापूर हादरलं

दारु पिऊन आईला शिव्या दिल्याच्या रागातून मित्रांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली. लखन रघुनाथ गायकवाड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापुरातील बाळे येथील लखन रघुनाथ गायकवाड हा तरुण मित्राच्याच गाडीवर क्लीनर म्हणून काम करतो. 

शुक्रवारी दुपारी लखन गायकवाड हा दारु पिऊन घरी आला होता. यावेळी त्याने आईकडे पैशाची मागणी करत शिवीगाळ केली.

आईला शिव्या देऊ नको म्हणत त्याचे मित्र नागेश कोळेकर,आशुतोष उर्फ अवी राजू गाडेकर यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. 

मात्र तरीही शिवीगाळ करत असल्यामुळे नागेश आणि आशुतोष या दोन्ही मित्रांनी लखन याला लाकडी दांडका आणि काठी, तसेच पाईपच्या साह्याने मारहाण करायला सुरुवात केली.

लखनला मारहाण करताना आई अलका आणि अजय भोसले दोघांनाही मारु नका असे सांगत होते. मात्र तरीही रागाच्या भरात दोघांनीही त्याला मारहाण केली.

 या मारहाणीत लखन गायकवाड गंभीर जखमी झाला होता. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 याप्रकरणी नागेश कोळेकर, आशुतोष उर्फ अवी राजू गाडेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments