google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीषण अपघात..भरधाव कार मालट्रकवर आदळून सराफ व्यावसायिक जागीच ठार सांगोला तालुक्यातील घटना

Breaking News

भीषण अपघात..भरधाव कार मालट्रकवर आदळून सराफ व्यावसायिक जागीच ठार सांगोला तालुक्यातील घटना

भीषण अपघात..भरधाव कार मालट्रकवर आदळून सराफ व्यावसायिक जागीच ठार सांगोला तालुक्यातील घटना


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

भरधाव कार पाठीमागून मालट्रकवर जोरात आदळून झालेल्या भीषण अपघातात डोक्यास गंभीर मार लागल्याने सराफ व्यावसायिक जागीच ठार झाला 

तर त्यांचा मुलगा जखमी झाला. जखमीवर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की कार चक्काचूर झाली.

हा अपघात सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला-मिरज महामार्गावर जुनोनी जवळ घडला.

 सतीश रामहरी कदम (वय ४५, रा. सध्या बंगळुरू, मूळ रा.रानंद, ता. माण, जि. सातारा) असे मृत सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. वरद सतीश कदम 

(वय १२, रा. रानंद, ता. माण, जि. सातारा) असे जखमी मुलाचे नाव आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे.

सतीश कदम यांचे बंगळुरू शहरात सोने-चांदीचे दुकान आहे. उन्हाळी सुट्टीत सतीश कदम कुटुंबासह गावी रानंदला आले होते. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास सतीश कदम व त्यांचा मुलगा वरद असे दोघेजण पितापुत्र मिळून 

रानंद येथून कार (एम. एच. १२ / एस. यू. ३२३३) मधून पंढरपूर, विजापूर मार्गे बंगळुरूला निघाले होते. मध्यरात्री ते पंढरपुरात आल्यावर त्यांचा रस्ता चुकला

 आणि ते विजापूर रोडने न जाता सरळ सांगोला मार्गे नागजकडे निघाले होते. वाटेत सांगोला-मिरज महामार्गावर जुनोनी गावाजवळ त्यांची कार पाठीमागून समोरील मालट्रकवर जोरात आदळली. 

या अपघातात सतीश कदम यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते जागीच मरण पावले तर त्यांच्या शेजारी डाव्या सीटवर बसलेला मुलगा वरद जखमी झाला.

Post a Comment

0 Comments