खळबळजनक...सॉरी मम्मी-पप्पा..! सुखी रहा...म्हणत घेतली फाशी!
तरुण मराठा आंदोलकाने उचलले टोकाचे पाऊल
छत्रपती संभाजीनगर :I love you bro and miss you all मी दत्ता कालिदास महिपाल पाटिल. काही
कारणाणुसार फाशी घेत आहे. तसेच गोपाल अर्बन माजलगाव या बँकेकडून मी 1 लाख रपये घेतले होते.
पण काही कारणामुळे काही हफ्ते भरले नाही. मला रोज फोन येते होते. मला खूप त्रास झाला. मोठ उद्योगपती कर्ज घेतात आणि भरत सोडून पळून जातात.
त्यात विजय माल्ल्या असेल किंवा निरव मोदी असेल त्याना कोणी काही बोलत नाही. पण शेतकऱ्यानांच सर्व बोलतात. दूसरे कारण म्हणजे मराठा आरक्षण मिळत नाही.
कारण काय आहे मी उपोषण करून फायदा झाला नाही. सरकारने त्याची भरपाई करावी (सौरी मम्मी-पप्पा, सुखी रहा... तुमचा दत्ता..एकीकडे मराठा आरक्षण मिळत नाही.
तर दुसरीकडे दिवसागणिक डोक्यावर कर्जाचा वाढत्या भाराच्या दडपणाखाली एका तरुण मराठा आंदोलकाने टोकाचे पाऊल उचलत
आपली जीवनयात्रा संपवलीय. हे कृत्य करण्यापूर्वी या तरुणाने आपल्या भावाला व्हॉट्सऍपवर मॅसेज करत आपल्या आत्महत्येचे कारणही सांगितले आहे.
ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दत्ता कालीदास महिपाल असे आत्महत्या करणाऱ्या या 25 वर्षे तरुणाचं नाव आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ती आपल्या भावाला व्हाट्सएपवर पाठवली होती. मृत दत्ता हा मूळचा बीड जिल्ह्यातील संभाजीनगरच्या वाळूज भागातील वडगाव कोल्हाटी या गावात राहत होता.
0 Comments