google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ! सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डची गोळी झाडून आत्महत्या

Breaking News

धक्कादायक ! सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डची गोळी झाडून आत्महत्या

धक्कादायक ! सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डची गोळी झाडून आत्महत्या


खळबळ, डोक्यात गोळी झाडून पोलिसाची आत्महत्या ! जामनेर शहरात मध्यरात्री थरार मुंबई येथे सचिन तेंडुलकरच्या बंगल्यावर होता गार्ड

 मुंबई येथून सुट्टीवर आलेल्या एसआरपीएफच्या पोलिसाने जामनेर शहरातील राहत्या घरी शासकीय पिस्टलामधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना

 बुधवार दि. १५ मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. सदरहू पोलीस हा मुंबई येथे सुपरस्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून

 कामास असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रकाश गोविंदा कापडे (वय ३९ रा. गणपती नगर, जामनेर) असे मयत पोलिसाचे नाव आहे. तो गणपती नगरात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, वहिनी अशा परिवारासह राहत होता. 

एसआरपीएफ जवान म्हणून तो मुंबई पोलीस येथे नोकरीला होता. सध्या त्याला सुपरस्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून नोकरी देण्यात आली होती. 

चार दिवसांपूर्वी मतदानाकरिता म्हणून ते गावी जामनेर शहरात आले होते. दोन दिवसांपूर्वी ते परिवारासह शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते.

मंगळवारी दि.१४ मे रोजी रात्री जेवण केल्यानंतर सर्व झोपी गेले. रात्री प्रकाश कापडे हे घराच्या वरच्या बाजूला असलेल्या खोलीत गेले. 

त्या ठिकाणी कपाळाला शासकीय पिस्टल लावून गोळी झाडून आत्महत्या केली. सदर बंदुकीचा आवाज झाल्यावर त्यांची आई आणि परिवार धावत आला.

 मात्र ते जागेवरच कोसळले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. प्रकाश कापडे यांच्या शासकीय पिस्टलमध्ये दहा गोळ्या होत्या. त्यातील दोन गोळ्या फायर झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पत्रकारांना दिली.

 दरम्यान सदर पोलिसाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आला होता.

 सदरहू घटनेमुळे कापडे परिवारावर मोठा आघात कोसळला असून त्यांना मानसिक धक्का बसला आहे.

या घटनेप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. दरम्यान या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments