google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. सांगोला शहरातील लॉन्ड्रीचालकाचा प्रामाणिकपणा; खिशात चुकून आलेले पैसे केले परत

Breaking News

मोठी बातमी.. सांगोला शहरातील लॉन्ड्रीचालकाचा प्रामाणिकपणा; खिशात चुकून आलेले पैसे केले परत

 मोठी बातमी.. सांगोला शहरातील लॉन्ड्रीचालकाचा प्रामाणिकपणा; खिशात चुकून आलेले पैसे केले परत



(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ( प्रतिनिधी )- गिऱ्हाईकाच्या खिशात चुकून आलेले पैसे परत करून लॉन्ड्रीचालकाने आपला प्रामाणिकपणा दाखवला आहे.

सांगोला शहरातील वज्राबाद पेठेत श्री. उत्तम पाटोळे यांचे अंबिका ड्रायक्लिनर्स अँड वॉशर्स हे दुकान आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते लॉंड्री व्यवसाय करतात.

 चार ते पाच वर्षापासून गिऱ्हाईक असलेल्या आकाश संजय घोंगडे यांनी आपले कपडे धुण्यासाठी अंबिका ड्रायक्लिनर्स यांच्याकडे टाकले होते.

 कपडे चेक करताना पाटोळे यांच्या लक्षात आले की, खिशात काहीतरी आहे. खिशात पाहिले असता ४ हजार ९०२ रुपये मिळून आले.

 पाटोळे यांनी घोंगडे यांना फोन करून माहिती दिली व त्यांना बोलावून त्यांचे पैसे त्यांना परत केले. सध्याच्या काळात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत

 असतानाही लॉन्ड्री चालक उत्तम पाटोळे यांनी मोठी रक्कम परत केल्याबद्दल घोंगडे यांनी पाटोळे यांचा सत्कार केला यावेळी त्यांचा मित्रपरिवार व समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments