खळबळजनक ...माजी आमदार रमेश कदम, ठाकरे गटाच्या नेत्यासह ७२ जणांना कोर्टाचा दणका; एक महिना कारावास
मोहोळ येथे केलेल्या तोडफोड प्रकरणी आता मोठी बातमी समोर येत आहे.
या प्रकरणी माजी आमदार रमेश कदम आणि ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह ७२ कार्यकर्त्यांना एक एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
यामुळे सोलापूरमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. नेमकं प्रकरण काय होतं, ते पाहू या.
मोहोळ येथील उड्डाण पुलाखालील जाळी तोडणे आणि पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्याप्रकरणी
माजी आमदार रमेश कदम आणि ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह ७२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. त्याप्रकरणी ही शिक्षा आज सुनावण्यात आली आहे. २०१५ साली
मोहोळ शहरातील उड्डाण पुलाखाली छोट्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी मज्जाव करत प्रशासनाकडून जाळी मारण्यात आली होती.
मात्र, जेसीबीद्वारे तत्कालीन आमदार रमेश कदम यांनी याविरोधात मोर्चा काढला होता. त्यांनी ही पुलाखालील जाळी तोडली होती.
त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आंदोलन
केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह एकूण ७२ जणांना १ महिना कारावास आणि १ हजाराचा दंड थोठावण्यात आला आहे.
0 Comments