google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज... इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांवर अज्ञातांचा हल्ला

Breaking News

ब्रेकिंग न्यूज... इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांवर अज्ञातांचा हल्ला

ब्रेकिंग न्यूज... इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांवर अज्ञातांचा हल्ला 


इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलाय. आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडलीय. 

इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदारांची गाडी आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. 

सोबत या खाल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती ती देखील डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केलाय गाडीच्या काचा फुटल्या 

असून सुदैवानं तहसीलदार यातून बचावले आहेत. या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुक्याच्या चोहोबाजूने नाकाबंदी करण्यात आलेले आहे.

इंदापूर शहरातील प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरील संविधान चौक येथे इंदापूरचे कार्यक्षम तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या अज्ञात हल्लेखोरांनी चटणीची पूड टाकून, लोखंडी रॉड, गज याने हल्ला केला.

सुदैवाने तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांचे चालक बचावले असून शासकीय वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी

 की, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे शहरातील जुन्या पुणे सोलापूर मार्गावरून सकाळी 11 वाजताच्या दरम्यान शासकीय वाहनातून

 (क्र. MH 42 AX 1661) आपल्या कार्यालयाकडे जात असताना संविधान चौक येथे विना नंबर असलेल्या चार चाकी गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वाहन चालक असलेल्या

 मल्हारी मखरे यांचे अंगावर चटणीची पुड टाकून लोखंडी रॉडने वाहनावर जोरदार हल्ला केला.यावेळी गाडी मध्ये असलेले श्रीकांत पाटील व त्यांचे चालक सुदैवाने बचावले आहेत. 

दरम्यान अज्ञात लोकांनी अगदी तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हल्ला केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच उडाली खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments