ब्रेकिंग न्यूज...सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक आचारसंहिता झाली शिथील
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने गुरुवार ९ मेच्या रात्रीपासून हॉटेल्स, बार हाऊसफुल्ल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आचारसंहिता शिथील झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आनंदी आहेत.
इतक्या दिवसात झालेले नुकसान भरुन निघेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
आचारसंहितेमुळे गेले महिनाभर रात्री साडेनऊ वाजता हॉटेल्स बंद केली जात होती. निवडणूक
आयोगाच्या निर्देशाप्रमाणे रात्री साडेनऊ वाजता हॉटेल्स आणि बार बंद केले जाऊ लागल्याने या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता.
एकीकडे सुट्ट्या सुरू झाल्या असतानाही म्हणावा तसा या व्यवसायामध्ये उठाव दिसत नव्हता. अशातच बाहेरगावांहून येणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसत होता.
खासगी कंपन्यांच्या रात्री होणाऱ्या बैठका, कार्यक्रम, गेट टुगेदर असे कार्यक्रमही आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आले होते. अशातच मंगळवार ७ मे रोजी मतदान झाल्याने
गुरुवार ९ मे पासून आचारसंहिता शिथिल झाली. त्यामुळे रात्री शहरातील विविध हॉटेल्स आणि बारवर गर्दी होण्याचा मार्ग मोकळा झाला.
मतदान यंत्रासाठी रात्रभर अधिकारी कर्मचाऱ्यांनी जागून काढली रात्र; सर्व मतदान यंत्रे पोहोच झाल्यानंतरच सोडला सुटकेचा श्वास
सोलापूर आणि माढा लोकसभेसाठी मंगळवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली.
मात्र अनेक मतदान केंद्रावर लाबंच्या लांब रांगा होत्या. त्यामुळे काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
त्यामुळे मतदान यंत्रे घेऊन येण्यासाठी कर्मचाऱ्यांना रात्री उशीर होत होता. त्यामुळे सोलापुरातील रामवाडी गोडावून येथे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रात्रभर जागण्याची वेळ आली.
सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर लोकसभेसाठी जवळपास १ हजार ९६८ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले.
तर माढा लोकसभेसाठी २ हजार ३० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यापैकी अनेक मतदान केंद्रे शहरापासून लांब होती.
तर माढा लोकसभेसाठी माण आणि फलटण हे दोन तालुके सातारा जिल्ह्यातील होते. त्यामुळे या ठिकाणाहून मतदान यंत्रे घेऊन येण्यास मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बराच वेळ झाला होता.
तसेच प्रत्येक रूटला राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ठरवून दिल्या होत्या. त्या बसेस त्याच रूटने मतदान यंत्रे आणि कर्मचाऱ्यांना घेऊन परत येणार होत्या. त्यामुळे काही मतदान केंद्रावर उशीर झाल्याने त्या बसेसही
काही काळ अडकून पडल्या होत्या. त्यामुळे जसजशा रूटच्या गाड्या रामवाडी गोडावूनमध्ये दाखल होत होत्या त्याप्रमाणे मतदान यंत्रे तपासून जमा करण्यात येत होती.
ही प्रक्रिया रात्रभर सुरू होती. तर काही ठिकाणी गाड्या पहाटे आणि बुधवारी सकाळी पोहोचल्या. त्यामुळे बुधवारी दिवसभर ही मतदान यंत्रे जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती.
सर्व मतदान यंत्रे रामवाडी गोडावूनमध्ये जमा झाल्यानंतरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
जिल्हाधिकाऱ्यांसह सहायक निवडणूक अधिकारी जागले रात्रभर
रामवाडी गोडावूनमध्ये जसजशा मतदान यंत्रे घेऊन गाड्या दाखल होत होत्या तशा पध्दतीने यंत्रे जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती.
यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, निवडणूक निर्णय अधिकारी
गणेश निराळी, सर्वच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मंगळवारची रात्र जागून काढली. सर्व मतदान यंत्रे गोडावूनमध्ये जमा झाल्यानंतरच प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.
0 Comments