google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठ्याचं लेकरू काहीही करू शकतं का? 17 वर्षीय पोराला बापाने गाडी दिली; पोराने दारु पिऊन दोघाजणांचा बळी घेतला; न्यायालयाने लगेचच जामीनही दिला! काय आहे पुण्यातलं प्रकरण?

Breaking News

मोठ्याचं लेकरू काहीही करू शकतं का? 17 वर्षीय पोराला बापाने गाडी दिली; पोराने दारु पिऊन दोघाजणांचा बळी घेतला; न्यायालयाने लगेचच जामीनही दिला! काय आहे पुण्यातलं प्रकरण?

मोठ्याचं लेकरू काहीही करू शकतं का? 17 वर्षीय पोराला बापाने गाडी दिली; पोराने दारु पिऊन दोघाजणांचा बळी घेतला;


न्यायालयाने लगेचच जामीनही दिला! काय आहे पुण्यातलं प्रकरण?

पुण्यातील बड्या बापाच्या पोराने वाहन चालवण्याचा परवाना नसताना पोर्शे कार भरधाव चालवली आणि बेदरकारपणे गाडी चालवून पाठीमागून दुचाकीला धडक देऊन दोन आयटी इंजिनियरचा बळी घेतला.

ही पोर्शे कार सतरा वर्षाचा बांधकाम व्यवसायकाचा मुलगा चालवत होता. त्याला न्यायालयाने काही अटी आणि शर्तीनुसार लगेचच जामीन मंजूर केला. 

या घटनेने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शहरातील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कोर्टामध्ये पोलिसांनीच व्यवस्थित मुद्दे न मांडल्यामुळे संबंधित आरोपीला जामीन मिळाल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

रविवारी पहाटे ही घटना घडली असून अडीचच्या सुमारास पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचा संचालक विशाल अग्रवाल

 यांच्या सतरा वर्षाच्या मुलाने वेदांत अग्रवाल याने भरधाव वेगात पोर्शे कार चालवली. विशेष म्हणजे या कारला नंबर प्लेट नव्हती. 

या मुलाने हॉटेलमध्ये पार्टी करून घरी निघालेल्या आयटी अभियंता अनिस अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोष्टा यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात या दोघांचाही मृत्यू झाला.

घटनेनंतर अग्रवाल हा पळून निघाला होता, परंतु स्थानिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

 त्याच्यावर कलम 304 अन्वये सदोष मनुष्यधाचा गुन्हा देखील दाखल केला, मात्र घटनेवेळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या बड्या बापाचा पोरगा दारू पिलेला होता. 

मद्यधुंद अवस्थेत तो गाडी चालवत होता. त्यानुसार पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणीही केली, मात्र वैद्यकीय चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

अर्थात वाहन चालवण्याचे कायदे केंद्र सरकारने केले आहेत, ते अंमलबजावणीत आलेले देखील आहेत, 

अशावेळी 17 वर्षाच्या पोराला महागडी गाडी देऊन रात्रीच्या वेळी भरधाव चालवण्यास मुकसंमती असलेला बाप यासाठी दोष नाही का?

 त्याच्यावर कारवाई कधी होणार आहे? त्याच्यावरती गंभीर कलमे असलेले गुन्हे दाखल होणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

दुसरीकडे या संदर्भात गंभीर निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी याचा तपास वरिष्ठ स्तरावर केला जाईल असे मोघम उत्तर दिले आहे, 

त्याच्यावर लावलेली कलमे जामीनपात्र असली, तरी या पोराला अवघ्या पंधरा तासात जामीन मिळण्यामागे

 पोलिसांचीच उदासीन कार्यपद्धती अथवा पोलिसांची मदत करण्याची मानसिकता असलेली प्रशासकीय इच्छाशक्ती कारणीभूत आहे का? असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

सदोष मनुष्यवधाच्या खटल्यात जामीन मंजूर होतो हे सर्वश्रुत असले व आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास जामीन मंजूर केला असावा अशी माहिती असली,

 तरी कोणत्या परिस्थितीत ही घटना घडली? त्यावरून नेमके काय गुन्हे दाखल केले पाहिजेत? कलमे लावली पाहिजेत

 आणि त्यासाठीची कोणती परिस्थिती कारणीभूत आहे? यावर पोलिसांनी नेमका काय प्रकाश टाकला? असा देखील सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

या ठिकाणी जर सामान्य माणसाचं पोरगं असतं, तर ते खरंच एवढ्या लवकर सुटलं असतं का? रविवारचा दिवस आहे असं सांगत एवढी तत्परता दाखवली असती का? शिवाय घटना अतिशय गंभीर असल्याने,

 त्याचक्षणी घटनेची गंभीर परिस्थिती लक्षात घेता त्याच्या बापावरील गुन्हा दाखल झाला नसता का? असा देखील सवाल स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये आहे, जे ते विचारत आहेत.

Post a Comment

0 Comments