एन एच166 रत्नागिरी- सोलापूर महामार्गावर सांगोलानजीक वळण रस्ता वाहतुकीकरिता खुला अशोक कामटे संघटनेच्या पाठपुराव्याला यश
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांना सांगोला शहरा नजदीक उपरस्ता करावा किंवा मुख्य रस्त्यापासून लगत हा रस्ता करून द्यावा
याकरिता अनेक वेळा संबंधित विभागाला निवेदन देऊन,बैठका घेऊन पाठपुरावा केलेला होता त्याची अंमलबजावणी नुकतीच राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल घेऊन केली आहे
मिरज राष्ट्रीय महामार्गाकडून येणाऱ्या नागरिकांना, वाहनांना सांगोला शहरालगत वळण दिलेले नव्हते .
याकरिता सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय समाजिक संघटनेने गेल्या दीड वर्षात चार वेळा निवेदन दिलेले आहे.
सर्व वाहने महामार्ग चार पदरी असल्याने शहर सोडून बाह्यवळण रस्त्याने बाहेर 7 ते 10 किलोमीटर गेल्यावर पूर्ण लक्षात येत आहे त्याकरिता सूतगिरणीच्या
पुढे डाव्या बाजूला माऊली पेट्रोल पंपासमोर अधिकृत वळण व दिशादर्शकाची सोय तात्काळ करावी
याबाबत 1 एप्रिल 2023 रोजी प्रत्यक्ष भेट देऊन तात्काळ सदर काम मार्गी लावू असे राष्ट्रीय महामार्ग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीआश्वासन दिले होते
त्याची पूर्तता मार्च 2024 अखेरअद्याप झालेली नव्हती त्यावेळी संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची दिसून आले .
त्यानंतर पुढील 8 दिवसात याची दखल न घेतल्यास 1 मे 2024 महाराष्ट्र दिनी रास्ता रोको करणार असल्याचे शहरवासीयांनी संघटनेमार्फत कळविले आहे,
तरी तात्काळ वळण व्यवस्था करावी. असे पुन्हा दुसऱ्या स्मरणपत्राद्वारे कळविण्यात आले होते. अशोक कामटे संघटनेच्या स्मरण पत्राची दखल घेऊन
सदरचा वळण रस्ता शेतकरी सूतगिरणी येथील वजन काट्यासमोरून देण्यात आल्याने सांगोला शहरात येण्याकरता अनेक प्रवासी, नागरिकांची मोठी सोय झाली आहे त्यामुळे कमलापूर येथील सर्विस रस्त्याने येताना
जी गैरसोय होत होती ही समस्या संपलेली आहे. सदरच्या केलेल्या सोयीबद्दल अशोक कामटे संघटनेने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे आभार मानलेले आहे.
0 Comments