बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कला व विज्ञान शाखेचा बारावीचा निकाल 100 टक्के
एच. एस. सी. परीक्षा 2023-24 च्या यशस्वी विद्यार्थ्यांचे सुयश व अभिनंदन
सांगोला/ प्रतिनिधी( दशरथ बाबर शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज): विकास एज्युकेशन सोसायटी संचलित ,बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (कला व विज्ञान )
चोपडी या संस्थेचा बारावी कला व विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला लागला आहे. संस्थेने बारावी परीक्षेच्या १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
विज्ञान शाखेतील 108 विद्यार्थी यशाचे मानकरी ठरले:
1) नागणे प्रथमेश महादेव. याने 84.50% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
2) कोळवले दीक्षा सुनील हिने 76.33% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
3) हिप्परकर कोमल अंकुश, हिने 75.83%. गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कला शाखेतील 14 विद्यार्थी, यशाचे मानकरी ठरले
१) बाबर स्नेहल कोंडीबा, हिने 69.17% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
२) बाबर हर्षदा अंकुश. हिने 66.% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ३) तोरणे सानिका शंकर हिने 64.33% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला .
संस्थाअध्यक्ष, डॉ. आनंदराव बाबर ,सचिव, सुमन बाबर व सदस्य तसेच मुख्याध्यापक/ प्राचार्य, के. डी. बाबर .सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी, ग्रामस्थ यांच्यावतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
0 Comments