google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लोटेवाडी ता.सांगोला येथे इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न

Breaking News

लोटेवाडी ता.सांगोला येथे इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न

 लोटेवाडी ता.सांगोला येथे इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

लोटेवाडी प्रतिनीधी:- इस्लाम हा शांतता पूर्ण धर्म आहे. पवित्र अश्या रमजान महिन्या मध्ये रोजा पकडुन देवाची उपासना व प्रार्थना मनोभावे केली जाते.

यांचे औचित्य साधून सामजिक बांधिलकी जपत व बंधू मित्रता इफ्तार पार्टीचे आयोजन व जनतेच्या मनातील सरपंच लोटेवाडी संभाजी लवटे -पाटिल यांचा वाढदिवस व इफ्तार पार्टीचे आयोजन

 लोटेवाडी ता.सांगोला येथे करण्यात आले होते.या वेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत सदरची इफ्तार पार्टी संपन्न झाली.

यावेळी मुसा मुलाणी, समीर मुलाणी, रशीद मुलाणी,पप्पू मुलाणी, बादशाह मुलाणी, मुन्ना मुलाणी, अजमुद्दीन मुलाणी, दस्तगीर मुलाणी, फारुक मुलाणी, मोहसिन मुलाणी,

अरमान मुलाणी, नसीम मुलाणी, साहिल मुलाणी, शाहनवाज मुलाणी, इसाक मुलाणी, शकील शैख, फजू वसीम मुलाणी व लोटेवाडी येथील सर्व शेकाप पक्षाचे सर्व कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments