google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाणीचिंचाळे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गडहिरे यांचा बहुजन समाज पार्टी या पक्षांमध्ये त्यांच्या समर्थकासह जाहीर पक्ष प्रवेश

Breaking News

वाणीचिंचाळे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गडहिरे यांचा बहुजन समाज पार्टी या पक्षांमध्ये त्यांच्या समर्थकासह जाहीर पक्ष प्रवेश

वाणीचिंचाळे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गडहिरे यांचा बहुजन समाज पार्टी या पक्षांमध्ये त्यांच्या समर्थकासह जाहीर पक्ष प्रवेश


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

वाणीचिंचाळेः महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मा. प्रशांत चंदनशिवे व अजय ठोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली 

वाणीचिंचाळे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गडहिरे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह बहुजन समाज पार्टी मध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला.

 सांगोला विधानसभेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले

 या अभिवादन कार्यक्रम व पक्षप्रवेशासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे बहुजन समाज पार्टीचे जेष्ठ नेते मा. राहुलजी सरवदे, 

सोलापूर जिल्हा प्रभारी मा. भालचंद्र कांबळे, जिल्हा अध्यक्ष मा. बबलूजी गायकवाड साहेब, माढा लोकसभा प्रभारी adv. संजीव सदाफुले साहेब, सांगोला विधानसभा प्रभारी कुंदनजी बनसोडे हे मान्यवर उपस्थित होते

 या सभेला संबोधित करतअसताना मा. भालचंद्र कांबळे यांनी महापुरुषांच्या संघर्षमय इतिहास सांगितला त्याचबरोबर बबलूजी गायकवाड यांनी

बहुजन समाज पक्ष हा देशातील तिसरा क्रमांकाचा पक्ष असून देशातील सर्व बहुजन, आदिवासी, मुस्लिम सर्व आंबेडकरवादी यांचा पक्ष असून येणाऱ्या

लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाला मतदान करून बहण कु. मायावती यांना पंतप्रधान बनण्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून आणावे 

असे सांगितले. उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर वाणीचिंचाळे ग्रामपंचायत सदस्य व वाकी,मेडशिंगी, 

आलेगाव, अकोला, सोनंद घेरडी या गावातील त्यांचे सहकारी यांनी बहुजन समाज पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षाने बाळासाहेब गडहिरे यांना बहुजन

समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष (युवक आघाडी) हे पद दिले. या कार्यक्रमाचीप्रस्तावना बसपाचे तालुकाध्यक्ष कालिदास कसबे यांनी केले व आभार अजय ठोकळे यांनी मांडले

 या अभिवादन सभेसाठी व पक्ष प्रवेशसाठी सांगोला शहरातील व ग्रामीण भागातील बहुजन समाज पार्टीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments