धक्कादायक दुःखद बातमी ! शेकाप नेते बाबासाहेब करांडे यांचे निधन
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब करांडे यांचे निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी लोटवाडी ता. सांगोला येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
पायाला गँगरीन झाल्याने त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते या उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बाबा करांडे हे 2007 ते 2012 दरम्यान जिल्हा परिषदेचे सदस्य होते,
यापूर्वी सलग पाच वर्ष ते लेबर फेडरेशनचे चेअरमन राहिले होते. सध्या ते लेबर फेडरेशनवर संचालक होते.
सोलापूर जिल्ह्यातील कर्मचारी चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळखहोती. जिल्हा परिषद चालक यांच्या विविध प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला होता.
सोलापूर जिल्हा वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष होते त्यानंतर राज्याचे वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष झाले
तर नंतर सोलापूर जिल्हा परिषद मध्यवर्ती कर्मचारी संघटना सर्व संघटनांची समन्वय समिती स्थापन केली. पतसंस्था क्रमांक दोनचे मार्गदर्शक मोलमजुरांसाठी स्वतंत्र पतसंस्था स्थापन केली नंतर त्याचे रूपांतर पतसंस्था क्रमांक तीन मध्ये करण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या वर अन्याय झाल्यानंतर वेळोवेळी अत्यंत कडक शब्दात प्रशासनाबरोबर प्रखर विरोध करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांची असायची.
कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठीप्रशासनाशी कधी तडजोड केली नाही सर्व संघटनांची अत्यंत सलोख्याचे समन्वयाचे संबंध ठेवल्याने कर्मचारी संघटनेचे वज्रमुठ बांधली होती.
त्यांच्या कालावधीतच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात आंदोलन घेतले त्यानंतर त्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पाच दिवसात बदली सुद्धा झाली
अशा पद्धतीचे काम बाबा कारंडे यांचे होते. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर ही कर्मचारी संघटनेच्या तक्रारी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांचा एक भक्कम आधारवड होता.
0 Comments