google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ...पोलिस कर्मचाऱ्याचा खून ; दुसरा पळून जात वाचवला जीव

Breaking News

खळबळजनक ...पोलिस कर्मचाऱ्याचा खून ; दुसरा पळून जात वाचवला जीव

खळबळजनक ...पोलिस कर्मचाऱ्याचा खून ; दुसरा पळून जात वाचवला जीव 


मध्यवर्ती कारागृहात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाल्याने पोलीस विभागात खळबळ माजली आहे.

 खून झालेल्या पोलिसाचा मित्र पळून गेल्याने तो बचावला आहे.पण तो देखील गंभीर जखमी झाला। असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

सिद्धार्थ बन्सीलाल जाधव (वय ४२), असे मृत पोलिसाचे नाव असल्याची माहिती असून तो हर्सूल कारागृहात कर्तव्यावर होता अशी माहिती हर्सूल पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी दिली.

खुनाच्या घटनेमागचे नेमके कारण सोमवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी रक्ताचे डाग दिसून आले. 

यातून ठेचून खून करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून मृत सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र सचिन दाभाडेही या घटनेत जखमी झाले आहेत. 

त्यांच्यावर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत. सचिन दाभाडे व मृत सिद्धार्थ जाधव हे दोघे कारागृहाच्या मैदानावर एकत्र बसले हाेते. त्याच दरम्यान, हल्ला झाला.

सिद्धार्थला ठेचून मारले तर सचिन यांनाही मारताना ते बचावासाठी पळाले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक मिसाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली.

 पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह घाटीत हलवला. मृत सिद्धार्थ यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे

Post a Comment

0 Comments