सांगोला तालुकेतील वाधित शेतकऱ्यांना(एकशे सत्तावन कोटी सात लाख सदोसष्ट हजार फक्त)
एवढी रक्कम मंजुर तहसीलदार मा.संतोष कणसे
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रं, एसीवाय-२०२३/प्र.क्र.५८/म-७ दिनांक २९/०२/२०२४ अन्वये खरीप हंगाम २०२३ मधील दुष्काळामूळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता
सांगोला तालुकेतील वाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी एकुण १५७,०७,६७०००/- (एकशे सत्तावन कोटी सात लाख सदोसष्ट हजार फक्त) एवढी रक्कम मंजुर करणेत आलेली आहे.
खरीप हंगाम २०२३ मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान प्रचलित कार्यपध्दतीनुसार
वितरीत न करता MAHA IT यांचेकडुन विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीव्दारे वितरीत करण्याची कार्यपध्दती शासन निर्णय दि. २४/०१/२०२३ अन्वये निश्चित करण्यात आली आहे
व त्यानुसार विशिष्ट क्रमांक वादी मधील लाभाथी यांना नजिकच्या Common Service Centre (CSC-SPV) अथवा आपले
सरकार सेवा केंद्र येथे जाऊन त्यांनी आधार क्रमांकाव्दारे बायोमेट्रीक ओळख पटविणे आवश्यक आहे. दि. २१/०४/२०२४ रोजी पर्यंत सांगोला तालुकेतील
एकुण ५५१०७ खातेदार रक्कम रुपये ८३,२६,८९,०६७/ (त्र्यांऐशो कोटी सच्चीस लाख एकोनव्वद हजार सदोसष्ट फक्त) रुपयेच्या यादया रजिस्टर्ड पंचनामा या शासनाचे पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत.
उर्वरित शेतकरी खातेदार यांनी लवकरात लवकर खरीप २०२३ दुष्काळ अनुदान मिळणेकामी विहित नमुन्यातील
फॉर्म व त्यासोबत आधारकार्ड, बैंक पासबुक व ७/१२ उतारेची झेरॉक्स प्रत सबंधित तलाठी यांचेकडे जमा करणेचावत प्रशासनाकडून विनंती करणेत येत आहे.
आजअखेर ३४७७८ खातेदार व त्यांची रक्कम ५४,९८,२४,६१८/- (चौपन्न कोटी अठवान्नव लाख चौविस हजार सहासे अठरा, एवही रक्कम सबंधित शेतकरी यांचे खातेवर शासनाकडून DBT व्दारे जमा करणेत आलेली आहे,
आज अखेर एकुण ९४१८ एवढया खातेदारांची ई-केवायसी करणे प्रलंबित आहे. ई-केवायसी पूर्ण केलेले शेतकरी यांचे खातेवर शासनाकडून लवकरच अनुदान DBT
व्दारे वितरीत करण्यात येणार आहे.
तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तलाठी यांचेशी संपर्क साधून VK नंबर प्राप्त करून घ्यावा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी करणेवायत प्रशानाकडुन आव्हान करण्यात येत आहे.
0 Comments