महामानव डॉ बाबासाहेब यांची जयंती भव्य दिव्य आणि शांततेत साजरी व्हावी :- सुरजदादा बनसोडे
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती जगभर विविध कार्यक्रमाने साजरी होत असून
प्रत्येक ग्रामीण भागातील खेड्यागावा पर्यंत हा आनंदोत्सव साजरा केला जातो
परंतु काही जातीवादी प्रवृत्तीना हे बोचत आहे अशी जातीवादी प्रवृत्ती काही ना काही अनुचित प्रकार
घडवण्याचा प्रयत्न करतात त्याचाच एक भाग म्हणजे 2 ते 3 दिवसापूर्वी सांगोला शहरात घडलेला प्रकार की आशा घटनेमुळे सामाजिक तेड निर्माण होऊन शांतता
आणि सुव्यवस्था बिघडवणे हाच हेतू असतो अशा प्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत साजरी करावी ,
जयंती साजरी करताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्या
, गावच्या इतर समाजाच्या इतर राजकीय नेते मंडळींचा हस्तक्षेप टाळा , तो नेता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आदर असेल
तर तो स्वतः येईल , मिरवणूक काढत असताना पोलीस स्टेशन चा रीतसर परवाना घेऊन पोलीस बंदोबस्त घ्या कारण
निवडणूक असल्यामुळे राजकीय नेते मंडळी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अनुचित प्रकार घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही
, आपण आपल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत साजरी करायची आहे विघातक प्रवृत्तीला
कायदेशीर रित्या पोलीस खात्याच्या मदतीने ठेचून काढू आणि त्या वाईट प्रवृत्तीला आपण सर्वजण मिळून कडाडून विरोध करू असे ग्रामीण भागातील जयंती साजरी
करणाऱ्या आंबेडकरी समाज व बौद्धबांधवांना रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष व नगर सेवक सुरजदादा बनसोडे यांनी आवाहन केले
0 Comments