सांगोल्याचे सुपुत्र संजय देवकते यांच्या नावे नकल पुश अप्स प्रकारात विश्वविक्रम
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला तालुक्याचे सुपुत्र संजय आनंदराव देवकते यांनी नकल पुश अप्स प्रकारात विश्वविक्रम केला असून, याची
नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. यामुळे संजय यांनी सांगोला तालुक्याच्या नावलौकिकात भर टाकून सांगोला तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे.
१७ मार्च रोजी मुंबई येथे १ मिनिटात १२१ नकल पुश अप्स काढून स्वतःच्या नावावर हा विक्रम प्रस्तापित केला.
यावेळी त्यांनी या अगोदरचा ११८ नकल पुश अप्स काढण्याचा रेकॉर्ड मोडीत हा नवा रेकॉर्ड स्वतःच्या नावे केला. संजय देवकते हे मूळचे सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावचे आहेत. ५ वर्षापासून ते भारतीय नौसेनेत कार्यरत आहेत.
यापूर्वी सांगोला तालुक्यातील अनेक खेळाडूंनी आंतर राष्ट्रीय पातळीवर यश मिळविले आहे. संजय देवकते यांच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्या यशाबद्दल कौतुक होत आहे.


0 Comments