google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..गाव तिथे बिअरबार, आनंदाच्या शिध्यात व्हिस्की… या महिला उमेदवाराचे आश्वासन

Breaking News

खळबळजनक..गाव तिथे बिअरबार, आनंदाच्या शिध्यात व्हिस्की… या महिला उमेदवाराचे आश्वासन

 खळबळजनक..गाव तिथे बिअरबार, आनंदाच्या शिध्यात व्हिस्की… या महिला उमेदवाराचे आश्वासन


लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या वनिता जितेंद्र राऊत या महिला उमेदवाराने खासदार म्हणून निवडून 

आल्यावर ” गाव तिथे बियर बार ” सुरू करून बेरोजगारांना बिअर बारचे परवाने वितरीत करण्याचे आश्वासन दिले आहे.

विशेष म्हणजे या महिला उमेदवाराने खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा केली आहे.

चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात निवडणूक रिंगणात एकूण १५ उमेदवार आहेत. 

यात काँग्रेस, भाजप, वंचित अश्या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. मात्र सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात चर्चा आहे 

ती अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांची. विकास कार्याचे आश्वासन घेऊन नेते जनते समोर उभे होतात.

 याला वनिता राऊत अपवाद ठरल्या आहेत. गाव तिथे बिअर बार उघडू. बेरोजगारांना बिअर बारचे परवाने देऊ, असे आश्वासन त्या देत आहेत.

Post a Comment

0 Comments