ब्रेकिंग न्यूज! सोलापुरात सोमवारी मोदींची जाहीर सभा
देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे.
राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत.
देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी अलीकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता प्रचारात रंगत आली आहे.
दरम्यान सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा होणार आहे. मोदी यांची जाहीर सभा २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सोलापुरातील होम मैदानावर होणार आहे.
0 Comments