google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तू मला आज पैसे नाही दिले तर,मी तुझ्या घरी येऊन गोंधळ घालीन सोलापुरात पतीने केली पत्नीची हत्या

Breaking News

तू मला आज पैसे नाही दिले तर,मी तुझ्या घरी येऊन गोंधळ घालीन सोलापुरात पतीने केली पत्नीची हत्या

तू मला आज पैसे नाही दिले तर,मी तुझ्या घरी येऊन गोंधळ घालीन सोलापुरात पतीने केली पत्नीची हत्या 


सोलापूर :- पैशाच्या कारणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना १४ एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास केंगनाळकर वीट भट्टी जवळ

 ताई चौक स्वागत नगर येथे घडली. याप्रकरणी सैफन मोदीन शेख (वय-४९,रा.किरण नगर,स्वागत नगर जवळ,नई जिंदगी)

 याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वतः आरोपी सैफन शेख हा चाकूने पत्नीच्या गळ्यावर व इतर भागावर वार करून 

पत्नी मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर स्वतः चाकू घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे येथे हजर झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांची पत्नी यास्मिन सैफन शेख

 (वय-४०,रा.पाथरूट चौक) यांनी पती सैफन याला मला तू ७० हजार रुपये कधी देणार आहेस, मला देणेकरांचे वारंवार फोन येत आहे. तू मला आज पैसे नाही दिले

 तर,मी तुझ्या घरी येऊन गोंधळ घालीन तुला व तुझ्या घरच्यांना सोडणार नाही. तुला आज काय आहे ते दाखवते अशी धमकी देऊन फिर्यादी यांच्या कानाखाली मारले.

 त्यानंतर फिर्यादी सैफन शेख याने चिडून जाऊन आजूबाजूला कोणीही नसल्याचे पाहून त्याच्या डाव्या कमरेला खोचून ठेवलेला चाकू बाहेर काढून पत्नी यास्मिन हिच्या गालावर, मानेवर वार केला.

 त् यानंतर चाकूने दुसरा वार हा पत्नीच्या डाव्या बाजूकडील पोटात मारून पत्नीच्या दोन्ही हातांच्या मनगटाच्या नसा कापून ती मयत झाल्याची 

खात्री झाल्यानंतर फिर्यादी याने पत्नी यास्मिन हिला ज्या चाकूने वार केला तो चाकू घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे येथे हजर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

याप्रकरणी सैफान शेख याने स्वतः एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदनशिव हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments