फडणवीसांची मोठी खेळी ; विजयसिंह मोहिते पाटलांच्या “या” पुतण्याने दिला भाजपा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठींबा
मोहिते पाटील कुटुंबाने भाजपाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.
मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर माढा मतदारसंघात रोज नव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे
धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठींबा दिला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांची दहशत मोडून काढण्यासाठी आपण हा पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची अकलूज येथे सभा होतं आहे. तत्पूर्वी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांची प्रतापगड या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
त्यासोबत मोहिते पाटलांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीला आणि मोहिते पाटील कुटुंबाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
0 Comments