google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मंजूर

Breaking News

सांगोला येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मंजूर

 सांगोला येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मंजूर


सांगोला प्रतिनिधी ;  यातील फिर्यादी भगवान बापू चव्हाण यांचा मयत मुलगा नामे संजय भगवान चव्हाण याचे मौजे नेज तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक येथे 

लाथा बुक्यांनी मारहाण करून त्याचे आरोपीने मोटार सायकल वरून अपहरण केले व त्यास सांगोला येथील उदनवाडी ते चोपडी निर्जन रोडवर आणून

 मारहाण करून दगडाने ठेचून खून केल्या बाबत सांगोला पोलीस स्टेशन येथे दिनांक ७/२/२०२२ रोजी भा. दं. वि कलम ३०२, ३६४, २०१, १२० ब, ३२३,१४३,१४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्यानंतर यातील एकूण पाच आरोपीना अटक करण्यात आली होती सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींन विरुद्ध पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले 

त्यानंतर आरोपी अनिल जकाप्पा पुजारी यांनी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अँड. विजय बेंदगुडे यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला . सदर जामीन अर्जाच्या सुनावणीत आरोपींच्या वतीने 

अँड. विजय बेंदगुडे युक्तीवादात आपली बाजू मांडताना  मे. कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की सदर ची केस परस्थिती जन्य पुराव्या वर आधारित आहे तसेच परस्थिती जन्य पुराव्याची कोणतीही साखळी जुळत नाही .

फिर्याद ही अनोळखी इसमाविरुद्ध दाखल आहे आणि यातील फिर्यादी आणि साक्षीदारांच्या जबाबतील विसंगती वरून असे स्पष्ट दिसून येत आहे की आरोपीने कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला नाही ,

 तसेच दोषारोप पत्राचे अवलोकन केले असता सदर घटनेत कोणताही प्रतक्ष्य नेत्र साक्षिदार नाही व आरोपीने विरुद्ध कोणताही ठोस पुरावा

 दोषारोप पत्र मध्ये आलेला नाही आरोपींना केवळ सवंशया वरून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. . पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायाधीश श्री. एम .बी .लंबे साहेब यांनी

 आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस ४०,०००/- जातमुचलक्या जर जामीन अर्ज मंजूर केला आहे. सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने अँड. विजय साहेबराव बेंदगुडे यांनी काम पाहिले तर सरकार पक्ष्याच्या वतीने अँड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले

Post a Comment

0 Comments