google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोला तालुक्यात टेंभू योजनेच्या पाण्याची पळवा पळवी; शेतकऱ्यांची पोलिस ठाण्यात तक्रार

Breaking News

खळबळजनक..सांगोला तालुक्यात टेंभू योजनेच्या पाण्याची पळवा पळवी; शेतकऱ्यांची पोलिस ठाण्यात तक्रार

 खळबळजनक..सांगोला तालुक्यात टेंभू योजनेच्या पाण्याची पळवा पळवी; शेतकऱ्यांची पोलिस ठाण्यात तक्रार 


सांगोला तालुक्यात टेंभू योजनेच्या पाण्याची पळवा पळवी सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुनोनी जवळ शेतकऱ्यांनी गेट काढून पाणी वळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकारामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

सांगोला तालुक्यात सध्या टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. अधिकाऱ्यांनी टेल टू हेड असे नियोजन केले असताना जूनोनि गावाजवळ काही

 शेतकऱ्यांनी जेसिबिने स्वतः दरवाजे उघडुन पाणी वळवून आपल्या भागात नेल्याची तक्रार या कालव्यावर टेल भागात अवलंबून आसलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. 

या पूर्वी सुद्धा त्यांनी असे प्रकार केले होते. त्यावेळी त्यांना समज दिली होती. आता मात्र, राजुरी, वाटंबरे, निजामपूर, कारंडेवडी, अकोला , बुरणंगे वाडी, कडलास , 

सोनंद या गावातील शेतकऱ्यांनी कालव्याची दारे काढणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी थेट पोलिस स्टेशन गाठले आहे. टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी सदर 

शेतकऱ्यांना टेल मधील शेतकऱ्यांना पाणी दिल्यानंतर पाणी मिळेल असे सांगूनही या कालव्यातून पाणी पळवा पळवी सुरू आहे.

 यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीच्या पाण्यावरून सांगोला तालुक्यात पाण्याची पळवा पळवी सुरू असल्याचे दिसत आहे.

सांगोला कालबा नंबर १२/७०० किमी आउट लेटे जेसीबी च्या साहयाने उघडून तलावात पाणी सोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान 

केल्याप्रकरणी २३ जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची फिर्याद जुनोनी पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी महेश पाटील यांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २१ फेब्रुवारी २०२४ रोजी घानंद तलाव आटपाडी येथून सांगोला तालुक्यात शेतकऱ्यासाठी शेतीला पाणी सोडलेले होते, 

तेव्हा पासून पाटबंधारे द्वारे शेतकऱ्याला नियमा प्रमाणे पाणी देणे चालू होते. दि.०८ मार्च २०२४ रोजीसकाळी ११/३० वाजता सांगोला कालवा साखळी नंबर १२/७०० 

किमी तिप्पेहळळी ठिकाणा पासून पुढे कालव्याच्या शेवट्या भागात मौजे कडलास, बुरगेवाडी, बाटंबरे, व राजुरी या भागात पाणी चालू होते.

तसेच साखळी क्र. १२/७०० कि.मी या ठिकाणी पाहणी करीता आटपाडी पाटबंधारे विभाग येथील कर्मचारी बाळासाहेब जाधव यांना अतिरीक कामाकाजा करीता नेमणूक केलेली होती. 

बाळासाहेब जाधव यांनी फिर्यादी महेश पाटील यांना सकाळी ११/३० चाजता फोन करून कळविले की, २० ते २५ लोक सहा ते सात मोटार सायकल वरती आले, 

काही लोक चार चाकी वाहनातून आहेत व त्या लोकांसोबत एकजेसीबीचे सहयाने कॅनॉलचे आउट लेट उघडून पाणी सोडून दिलेले आहे 

असे कळविले होते. त्यावेळी फिर्यादी सह उपविभागीय अभियंता गायकवाड, कालवा निरीक्षक संभाजी होवाळ आदी सर्वजण 

त्या ठिकाणी पाहीले असता त्या ठिकाणी आउट लेट उघडून दुसरी कडे ओढ्यामार्फत जुनोनी तलावा मध्ये पाणी सोडलेले दिसले होते. 

सदर कालव्याचे पाणी कोणी विनापरवाना सोडले या बाबत माहीती विचारले असता २३ जणांनी विनापरवाना

 सांगोला कालवा नंबर १२/७०० किमी आउट लेट हा जेसीबी च्या साहयाने उघडून तलावात पाणी सोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments