दुर्दैवी घटना! सांगोला रस्त्यावर कारची मागून धडक, मंगळवेढ्यातील दुचाकीस्वार जागीच ठार
सांगोला-मंगळवेढा रस्त्यावर कारने दुचाकीस सोमवारी दुपारी पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
संजय आनंदा शिंदे (वय ४०, रा.कचरेवाडी, ता.मंगळवेढा) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.
धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार (एम एच २६ सी ई ४२२८) च्या अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्याद मृताचा भाऊ बाळू आनंदा शिंदे यांनी दिली आहे. हा अपघात सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सांगोला ते मंगळवेढा रस्त्यावर झाला आहे.
याबाबतची माहिती अशी, सोमवारी दुपारी १ वाजण्यास सुमारास सांगोला ते मंगळवेढा येणाऱ्या रस्त्यावर फिर्यादीचे भाऊ संजय आनंदा शिंदे हे मंगळवेढ्याकडे येण्यासाठी निघाले असताना
दुपारी १२:४५ वाजण्याच्या सुमारास सांगोल्याकडून मंगळवेढ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वेगात येऊन दुचाकीस (एम एच १३ डी एस ९०२५) पाठीमागून जोराची धडक दिली. अधिक तपास पोलिस हवालदार कृष्णा जाधव करीत आहेत.


0 Comments