google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खजिना सापडल्याचे सांगून लुटले अन् तिघांना जिवंत जाळले.

Breaking News

खजिना सापडल्याचे सांगून लुटले अन् तिघांना जिवंत जाळले.

ब्रेकिंग न्यूज..खजिना सापडल्याचे सांगून लुटले अन् तिघांना जिवंत जाळले.


बेंगळूरू: कर्नाटकात एका कारमध्ये तिघांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. 'खजिना' शोधून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत तिघांची हत्या करण्यात आली आहे.

 तुमकुरु पोलिस याबाबतचा पुढील तपास करत आहेत.तुमाकुरू येथे कारमध्ये तीन जळालेले तिघेही मंगळुरूच्या बेलथनगडी तालुक्यातील रहिवासी आहेत. तिघांनाही खजिन्याचे आमिष दाखवून लुटले गेले. 

यानंतर तिघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह एका तलावाजवळ कारमध्ये टाकून कार पेटवून देण्यात आली. तपास पथकाला या घटनेबाबत अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. लवकरच संपूर्ण टोळी पकडली जाईल, अशी माहिती तुमकुरु पोलिसांनी दिली.

कुंचागी गावाच्या एका तलावाजवळ एक जळालेली कार सापडली होती. गाडीचा तपास केला असता त्यात तीन जळालेले मृतदेह आढळून आले. दुसऱ्या ठिकाणी तिघांचीही हत्या करण्यात आल्यानंतर मृतदेह तलावाशेजारील गाडीत टाकण्यात आले.

 त्यानंतर कार पेटवून देण्यात आली, असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपींनी तिघांनाही खजिन्याचे आमिष दाखवून बोलवले होते. आरोपींनी सोने-चांदीचा खजिना सापडल्याचे सांगून ते स्वस्त दरात विकायचे असल्याचे सांगितले होते.

 त्यामुळे हत्या झालेले तिघेही पैसे घेऊन आरोपींना भेटायला आले होते. आरोपींनी तिघांकडील पैसे लुटून त्यांचा खून केला आहे.

दरम्यान, संबंधित गुन्ह्यांमध्ये सहा आरोपींचा सहभाग आहे. यातील तिघांची ओळख पटवण्यात आली असून त्यांचा तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments