google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजेंवर गुन्हा दाखल ; तुझे हॉटेल जाळून टाकण्याची दिली धमकी….

Breaking News

सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजेंवर गुन्हा दाखल ; तुझे हॉटेल जाळून टाकण्याची दिली धमकी….

सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजेंवर गुन्हा दाखल ; तुझे हॉटेल जाळून टाकण्याची दिली धमकी….


सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर शहरातील सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 यापूर्वीही फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा गुन्हा दाखल झाल्याने मनीष काळजे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

वसीम अब्दुल गफार पेशइमाम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे सात रस्ता परिसरात स्टार हॉटेलचे मॅनेजर आहेत. 

या स्टार हॉटेल पाठीमागे मनीष काळजे यांनी शिवसेनेचे कार्यालय काढले आहे. या कार्यालयात जाण्यासाठी हॉटेलच्या बाजूला गेट आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मनीष काळजे यांच्या गेट समोर एक वाहन लावले होते 

त्यांनी त्या वाहनाला लाथ मारून हॉटेलमध्ये घुसले आणि मॅनेजरला उद्देशून “तुला कळत नाही का, तुझ्या कस्टमर च्या गाड्या आमच्या ऑफिसच्या गेट समोर लावतो” असे म्हणून त्या मॅनेजरच्या गालावर चापट मारली. 

तुझे हॉटेल जाळून टाकतो, यापुढे येथे कसा धंदा करतो ते मी बघतोच असे म्हणून धमकी दिली. तसेच काळजे यांच्या ड्रायव्हरने सुद्धा मॅनेजरला शिवीगाळ करून चापट मारली. 

हे सर्व त्या हॉटेलचा कामगार विकी हा आपल्या रेडमी मोबाईल मध्ये हे सर्व शूटिंग घेत असताना शिवीगाळ करत “माझी शूटिंग काढतो का” म्हणून त्याच्या हातातील 22 हजाराचा मोबाईल हिसकावून नेला आहे.

Post a Comment

0 Comments