google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याच्या अनाठायी कृती थांबवा !हिंदू जनजागृती समितीची सांगोला येथे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Breaking News

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याच्या अनाठायी कृती थांबवा !हिंदू जनजागृती समितीची सांगोला येथे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याच्या अनाठायी कृती थांबवा !


हिंदू जनजागृती समितीची सांगोला येथे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (जिल्हा सोलापूर) - सांगोला येथे हिंदू जनजागृती समिती च्या वतीने  सोमवार, 18 मार्च या दिवशी जिल्हाधिकारी यांच्या नावे 

तहसीलदार संतोष कणसे यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याच्या अनाठायी कृती थांबवण्याविषयी निवेदन देण्यात आले 

या निवेदनात पुढे म्हटले आहे की वर्ष 2024 ची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक काही दिवसांवर आली आहे 

येथे आठवड्याभरात याविषयीची निवडणूक आचारसंहिता लागू होईल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक गोष्टींवर प्रतिबंध आणले जातात किंवा नियम लागू केले जातात 

या संदर्भात राज्यात काही ठिकाणी निवडणुकांचे कारण सांगत नागरिकांच्या घरांवर लावण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत या संदर्भात निवेदनात म्हटले आहे की, 

1. भगवा ध्वज हा कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसून तो हिंदू धर्माचे धार्मिक प्रतीक आहे.

2. भगवा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आणि अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या हिंदवी स्वराज्याचा ध्वज आहे. 

3. निवडणूक आचारसंहिता ही निवडणूक लढवणारे उमेदवार, राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांना लागू होते. ती सर्वसामान्य व्यक्तीच्या धर्माचरणावर निर्बंध आणू शकत नाही. 

4. सामान्य नागरिकांनी त्यांच्या खाजगी मालमत्तेवर उदारणार्थ घर, दुकान, इमारत, वाहने आदी कोणता ध्वज लावावा कोणती धार्मिक प्रतीके लावावी हा प्रत्येकाचा अधिकार आहे. 

5. घरावर भगवा ध्वज लावणे हा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार समजला जाऊ शकत नाही तसे समजून जर तो ध्वज काढण्याची कृती केली गेली तर तो हिंदूंच्या धार्मिक आचरणावर गदा आणण्यासारखे होईल. 

6. एकाही घरावरील भगवा ध्वज जर शासकीय यंत्रणेने काढल्यास तो आमच्या दृष्टीने शासकीय यंत्रणेद्वारे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतुत केलेला प्रयत्न आहे, असे आम्ही मानू.

 तरी हिंदू समाजाने नेहमी कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडत प्रशासनाला साहाय्य केले आहे. तरी सामान्य हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावनांचा आदर करणे ही प्रशासनाचे कर्तव्य आहे.

 या दृष्टीने प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरे, मंदिरे, इमारती आदींवरील भगवे ध्वज काढू नयेत, असे स्पष्ट आदेश द्यावेत अशी आम्ही विनंती करत आहोत आपण निश्चितपणे ती मान्य कराल अशी आशा आहे.

 निवेदन देतेवेळी अनिल वाघमोडे, विकास गावडे, संतोष पाटणे, डॉक्टर मानस कमलापूरकर, दत्तात्रय चव्हाण, माणिक सकट, पांडुरंग भजनावळे,

 नवनाथ कावळे, सोमनाथ अनुसे, आण्णा अनुसे, संजय बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते. तर सुरेश बुरांडे यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.

Post a Comment

0 Comments