google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..लातूरातील सुप्रसिद्ध राजासाब टेलरच्या दोघांसह अपघातात तीन ठार

Breaking News

मोठी बातमी..लातूरातील सुप्रसिद्ध राजासाब टेलरच्या दोघांसह अपघातात तीन ठार

मोठी बातमी..लातूरातील सुप्रसिद्ध राजासाब टेलरच्या दोघांसह अपघातात तीन ठार 


हैदराबादहून कारने लातूरला येत असलेले लातूरातील सुप्रसिद्ध राजासाब व राजाजी टेलचे संचालक वाजीद पठाण

 व सोहेल गफुर शेख यांच्यासह हॉटेलमधील कामगार ओंकार कांबळे हे तिघे दि. ९ मार्च रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात ठार झाले आहेत.

 एका ऑटोरिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट एका हॉटेलमध्ये घुसून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वाजीद पठाण व सोहेल गफुर शेख यांचे नातेवाईक उम-याला गेले होते. ते उम-याहून विमानाने हैदराबाद येथे आले. त्यांना लातूरला आणण्यासाठी एमएच २४ बीआर ७८६८ या क्रमांकाच्या कारने हैदराबादला गेले होते. 

 हैदराबादहून लातूराला परत येत असताना लातूर-सोलापूर महामार्गावर औसाजवळील सीएनजी पंपाजवळील वळणावर एका ऑटोरिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

कार अतिवेगाने एका हॉटेलमध्ये घूसली. या अपघातात वाजीद पठाण, सोहेल शेख यांच्यासह हॉटेमधील कामगार ओंकार कांबळे ठार झाले आहेत. 

कारमधील पाच जणांपैकी दोघे ठार झाले असून इतर तिघांवर लातूरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत.

Post a Comment

0 Comments