जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियम व अटींचा भंग केले प्रकरणी,
विद्यामंदिर प्रशालेला प्रदान केलेली सरकारी १०२ गुंठे जागा सरकार जमा करण्याची मागणी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (विषेश प्रतिनिधी) ; सांगोला शहरातील मुळ सरकारी नरसरीची व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची आकारी पड जमीन सर्वे नंबर ७९० क्षेत्र १ हेक्टर २ आर हि जागा
तात्कालीन जिल्हाधिकारी यांनी सुमारे ६५ वर्षांपूर्वी अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांना अनेक नियम व अटी घालून हि जागा प्रदान केली होती.
परंतु अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी गेल्या ६५ वर्षांत तात्कालीन जिल्हाधिकारी सोलापूर यांनी घालून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींचे पालन करता
सदरच्या सरकारी नरसरी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकारीपड जागेवर जिल्हाधिकारी यांची कोणत्याही प्रकारची पुर्व परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम करून इमारती उभारल्या आहेत.
शिवाय सदरच्या सरकारी नरसरी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकारीपड जागेवर भोगवटादार सदरी स्वतःचे (अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ) लावून घेतले आहे.
या नावाचे पुढे नमूद असणाऱ्या फेरफार नंबर ५००४ चे वाचन केले असता हा फेरफार, पी डब्ल्यू डी कडून जमीन काढून घेवून आकारीपड कडे दाखल केलेचा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सदरची सरकारी नरसरी व सार्वजनिक बांधकाम विभागाची
असणारी आकारीपड जागा अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांना प्रदान केले बाबत तलाठी सांगोला यांच्या कडील ७/१२ पत्रकी कोणत्याही प्रकारची नोंद अढळून येत नाही.
या शिवाय सन १९८० साली सांगोला शहराचा सिटी सर्वे करण्यात आला होता. त्या वेळीही अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी सिटी सर्वे अधिकारी
यांना खोटी व दिशाभूल करणारी माहिती देवून सि.स.नं.३००३ या सिटी सर्वे उतारावर स्वतः चे (अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ) नाव दाखल केले आहे.
आणि सदर नावाच्या आधारे दुय्यम निबंधक सांगोला यांच्या कार्यालयात गहाण खत दस्त नंबर ३८४०/२००० दि.६/१२/२००० रोजी ५ लाख रुपयांचे कर्ज,सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँक,शाखा
सांगोला यांचे कडून कर्ज काढून सदरची सरकारी जागा जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कडील नियम व अटींचा भंग केलेला आहे. या ५ लाख रुपये कर्जाची नोंद सि.स.नं.३००३ वरील फेरफार नंबर ३७८ दि.२३/१/२००१ नुसार करण्यात आली आहे. क्रमशः
0 Comments