google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील ३ मंदिरांच्या विकासासाठी ४ कोटी ३९ लाखांचा निधी मंजूर : मा आम दिपकआबा साळुंखे पाटील

Breaking News

सांगोला तालुक्यातील ३ मंदिरांच्या विकासासाठी ४ कोटी ३९ लाखांचा निधी मंजूर : मा आम दिपकआबा साळुंखे पाटील

सांगोला तालुक्यातील ३ मंदिरांच्या विकासासाठी ४ कोटी ३९ लाखांचा निधी मंजूर : मा आम दिपकआबा साळुंखे पाटील


अकोला येथील श्री सिद्धनाथ मंदिर, जवळा येथील श्री नारायणदेव मंदिर आणि कडलास येथील श्री सोमनाथ मंदिराचा होणार कायापालट;

 दिपकआबा आणि शहाजीबापूंच्या पाठपुरव्याला यश सांगोला तालुक्यातील हजारो भाविक भक्तांचे आराध्य दैवत असणारे 

जवळा येथील श्री नारायणदेव, कडलास येथील श्री. सोमनाथदेव आणि अकोला येथील श्री. सिध्दनाथ या तिन्ही मंदिरांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात "ब" वर्गात समावेश झाला

 असून या मंदिराच्या विकासासाठी तब्बल ४ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.

यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून हजारो लाखो भाविक भक्तांचे आराध्य दैवत असणाऱ्या तालुक्यातील 

अनेक मंदिरांचा कायापालट करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू होता. यापैकी अकोला येथील श्रीक्षेत्र सिध्दनाथ तीर्थक्षेत्र, कडलास येथील श्रीक्षेत्र सोमनाथ तीर्थक्षेत्र 

आणि जवळा येथील श्रीक्षेत्र नारायणदेव तीर्थक्षेत्र या मंदिरांनाही भरघोस निधी मंजूर केला होता. या तिन्ही तीर्थक्षेत्रांचा दर्जा उन्नत करण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.

 माजी आमदार दिपकआबांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून सदर कामांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आणि गेली ७ वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावावर शासनाकडून मंजुरीची मोहोर उमटली.

तब्बल ७ वर्षे शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागणीला यश आल्याने अकोला येथील श्री सिद्धनाथ मंदिरांच्या विकासासाठी २ कोटी, जवळा येथील श्री नारायणदेव मंदिराच्या विकासासाठी १ कोटी २४ लाख रु. तर

 कडलास येथील श्री सोमनाथ मंदिराच्या विकासासाठी १ कोटी १५ लाख रु. असा एकूण ४ कोटी ३९ लाख रुपयांचा घसघशीत निधी मंजूर झाला आहे. मंजूर निधीतून कडलास येथील श्री सोमनाथ मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे, 

यात्री निवास बांधणे तसेच मंदिराचे अन्य सुशोभीकरण करणे अशी विकासकामे होणार आहेत तर जवळा येथील श्री नारायणदेव मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे, भाविकांसाठी घाट बांधणे, 

आणि मंदिर परिसराला संरक्षक भिंत बांधणे आणि अन्य सुशोभीकरण कामे करण्यात येतील तसेच अकोला येथील श्री सिद्धनाथ मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे, यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना

 यात्री निवास बांधणे, वाहनतळ बांधणे, मंदिर परिसराला संरक्षक भिंत बांधणे, परिसरात वाढलेली झाडे झुडपे काढणे, मंदिरात सोलर पॅनल बसवणे आणि सुशोभीकरणची अन्य कामे या निधीतून मार्गी लागणार आहेत.

 जवळा, अकोला आणि कडलास परिसरातील हजारो भाविक भक्तांची अनेक वर्षांपासून असलेली प्रलंबित मागणी अखेर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागल्याने भविकातून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments