सांगोला ब्रेकिंग!जादुटोणा करीत असल्याच्या वहिमावरुन वृध्द आत्याचा निर्घृणपणे खून; भाचा गजाआड
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोलापूर : सांगोला तालुक्यातील शीरभावी शिवारात वन विभागाच्या क्षेत्रात ११ मार्च रोजी घडलेल्या वृध्द महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेला
सुतावरून स्वर्ग गाठण्यात अवघ्या ७२ तासात यश आलं. मृत महिलेची ओळख पटण्यापासून सुरू झालेल्या तपास चक्रात तिची हत्येमागे, तिच्या भाच्याचा
विजय दत्ता खेंडकरचा हात असल्याचे समजल्यावर त्याच्यावर पाळत ठेवत अक्कलकोटच्या बाजार पेठेतून त्याच्या मुसक्या आवळल्या.
जादुटोणा करण्याच्या वहिमावरुन त्या वृध्द महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिलीय. ११ मार्चच्या सायंकाळी शीरबावी गावाच्या लगत
असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रात ५५ ते ६० वर्षीय महिलेची दगड आणि धारदार शस्त्राने वार करून खून केल्याच्या अवस्थेत दिसून आला होता.
याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात भादवि क ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेऊन
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला
हा गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी सूचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्था.गु. शाखेकडील
सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस निरीक्षक सुरज निंबाळकर यांचे पथकास अनोळखी मृत महिलेची ओळख पटवून आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यासंबंधी आदेशित केले होते.
त्यानुसार तिची ओळख पटविण्यात सपोनि धनंजय पोरे, पोउनि सूरज निंबाळकर यांना यश आलं. मृत महिला व्दारका बबन माने (रा. धायटी)
असल्याचे निष्पन्न झाले. घटने दिवशी ती धायटी परिसरात राहणाऱ्या तिच्या भावाकडे गेल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्या
दिवसापासून तिच्या भावाचे व भावाचे मुलाचे वर्तन संशयास्पद असल्याचे दिसून आले. त्याचा कसून तपास करता, भाचा आस्तित्व लपवून राहत असल्याचे लक्षात आले.
या गुन्ह्यातील संशयीत आरोपी याचा सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोउपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांनी पथकासह पंढरपूर,
सांगोला, अक्कलकोट येथे गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेत होते. गुरुवारी, १४ मार्च रोजी तो अक्कलकोट मंदिर परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिर परिसर तसेच बाजार पेठेत शोध घेऊन आरोपीस ताब्यात घेतले.
त्या संशयितास विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्यासंदर्भात कौशल्यपूर्ण तपासात, त्यानं आत्या द्वारका बबन माने ही तो आणि त्याच्या
कुटुंबावर जादूटोणा करीत होती. त्यामुळे आपल्या कुटुंबाची काही प्रगती होत नसल्याच्या रागातून ही हत्या केल्याचे त्यानं कबूल केले.
तिची चाकूने सपासप वार करून हत्या केली व तिची ओळख पटू नये यासाठी दगडाने ठेचल्याचीही कबुली त्याने दिली.
गुरुवारी अक्कलकोट येथे ताब्यात घेऊन त्यास अटक केल्यानंतर अधिक तपासण्यासाठी सांगोला पोलिसांकडे त्यास सोपविण्यात आले आहे.
सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खणदाळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
0 Comments