उद्या वाजणार लोकसभा निवडणुकीचे बिगुल! निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद
लोकसभा निवडणुकीच्या तारखांची उद्या घोषणा होणार आहे. शनिवार, 16 मार्च रोजी निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
माहितीनुसार, सार्वत्रिक निवडणुका 2024 आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर
करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ही पत्रकार परिषद घेतली जाईल. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केले जाईल.
उद्या दुपारी निवडणूक आयोग पत्रकार परिषदेद्वारे लोकसभा निवडणुका आणि अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक शेअर करणार आहे.
यावेळी लोकसभा निवडणूक 6 ते 7 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.
सध्या निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार आहेत. याशिवाय दोन नवीन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनीही पदभार स्वीकारला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी देशभरात जोरात सुरू आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची पदे रिक्त झाल्यानंतर विरोधक केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.
0 Comments