सांगोला तालुका महूद स्फोट प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल."या" वस्तूचा स्फ़ोट झाल्याचा पोलिसांचा अंदाज
सांगोला तालुक्यातील महूद गावात 29 फेब्रुवारी रोजी शक्तिशाली स्फोट झाला होता. यामध्ये एक जण जागीच मयत तर दुसरा गंभीर जखमी झाला होता.
याप्रकरणी आता टायर दुकानदार रामेश्वर बाड याच्यासह तिघांवर सदोष मनुष्यवधाचा आणि एक्स्प्लोसिव्ह सबस्टन्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल
करण्यात आल्याची माहिती सांगोल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी दिली आहे.
दरम्यान हा स्फोट जिलेटिनचा नसून केमिकलचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र हे केमिकल कोणते होते?
कशासाठी त्याचा वापर केला जात होता? असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत. या घटनेचा सखोल तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


0 Comments