सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथे पाणीप्रश्न बनला बिकट सुभाष भोसले यांच्याकडून टँकरने मोफत पाणीपुरवठा सुरू
चिकमहूद (ता.सांगोला) येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने चिकमहूद येथील पाणीप्रश्न बिकट बनला आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे.
यांची सामाजिक जाणीव ठेवून उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगोला तालुका युवासेनाप्रमुख सुभाष भोसले यांनी पुढाकार घेवून चिकमहूदकरांना टँकरने मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.
चिकमहूद येथे गेल्या काही महिन्यापूर्वी जलजीवन योजनेचे काम पूर्ण झाले आहे असे सांगितले जाते परंतु अजून एकदाही या जलजीवन योजनेच्या पाईपलाईन मधून पाणी बाहेर आलेले नाही.
पाणीपुरवठ्यावर कोट्यवधीचा निधी खर्च करुनही अद्याप चिकमहूदकरांचा पाणीप्रश्न सुटू शकलेला नाही.
त्यामुळे अनेक वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यंदा परिस्थिती अधिकच भयावह बनली आहे.
गावातील हातपंप, विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे.तर काही बंद पडन्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीकडून दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.
हंडाभर पाण्यासाठी येथील महीला व आबाल वृद्ध नागरिकांना परिसरातील शेत विहिरीवरुन भर उन्हात पायपीट करावी लागत आहे.
पाण्यासाठी नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी युवा सेना सांगोला तालुकाप्रमुख सुभाष भोसले यांनी स्वखर्चातून येथील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू केला आहे.
त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांचे सर्व सरातून अभिनंदन व कौतुक होत आहे व महिला वर्गांमधून समाधान व्यक्त होत आहे.


0 Comments