रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीमुळे
भाजपा पदाधिकाऱ्यांतच असंतोष मोदीजी तुमसे बैर नहीं, पर निंबाळकर तुम्हारी खैर नहीं
सांगोला/प्रतिनिधी : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. माढ्यातून भाजपाने जुना भिडूच पुन्हा एकदा मैदानात उतरवल्यानंतर
भाजपाकार्यकर्त्यांमधूनच आता मोदीजी तुमसे बैर नहीं, पर निंबाळकर तुम्हारी खैर नही अशी भावना व्यक्त होऊ लागल्याने यंदा माढ्याच्या मैदानातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना चांगलेच आव्हान निर्माण होणार आहे.
खासदार हे साडेचार वर्षांमध्ये मतदारसंघात फिरकले नाहीत कोविडच्या काळात फिरकले नाहीत त्यामुळे त्यांनी विकासाचा निधी न दिल्यामुळे मतदार
तीव्र नाराज आहेतमोदी लाटेतही २०१४ रोजी माढ्याचा गड अबाधित राखणाऱ्या अकलूजकर मोहिते पाटलांनीच २०१९ रोजी तब्बल लाखाचे मताधिक्य देऊन नवख्या रणजितसिंह निंबाळकर यांना माढा
लोकसभा मतदारसंघातून खासदार करून आपणच खऱ्या अर्थाने माढा लोकसभा मतदारसंघाचे किंगमेकर असल्याचे सिद्ध केले होते. परंतु २०१९ नंतर अकलूजकरांचे फलटणकर खा. नाईकनिंबाळकर यांच्याशी सबंध बिघडल्याने
खा नाईक निंबाळकर यांची यंदा वाट बिकट होऊ लागली आहे. अकलूजकर मोहित्यांच्या धैर्यशीलांनी थेट पक्षाच्या नेतृत्वालाच आव्हान देत आपण या मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगत
शड्डू ठोकल्याने खा नाईक निंबाळकरांची डोकेदुखी चांगलीच वाढलीआहे. पक्षातील नाराजी दूर करण्यात खा निंबाळकर कितपत यशस्वी ठरणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
एकीकडे लाखाचे मताधिक्य देणारा माळशिरस तालुका विरोधात असताना घरच्या मैदानातही त्यांना चांगल्याच संकटाचा सामना करावा लागेल असे दिसत आहे. महायुती मधील घटक पक्ष असलेल्याराष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते माजी
मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू सातारा जिल्हा परिषदचे मा अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही खा निंबाळकर यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे.
कोणात्याही परिस्थितीत आपण खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मदत करणार नाहीच असा ठाम निर्धार रामराजे आणि संजीवराजे यांनी केल्याने खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची डोकेदुखी वाढत चालली आहे.
त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार गेली साडेचार वर्षे फिरकले नाहीत त्यांनी कसलाच निधी दिला नाही
निवडणुकीच्या तोंडावर ते मतदारांच्या संपर्कात आहेत निवडणूका डोळ्यासमोर ठेवून गेली सहा महिन्यापासून ते मतदार संघात फिरकत नाहीत त्यामुळे मतदारात तीव्र नाराजी पसरली आहे
0 Comments