मोठी बातमी.. केदार हॉस्पिटल येथे १५ मार्च ते ३० मार्च दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबीर पंधरवडा
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला येथील वासुद रोड दत्तनगर जवळ असणाऱ्या केदार हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर पंधरवडा याचे आयोजन केले आहे.
सदरचे शिबीर दिनांक १५ मार्च ते ३० मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. सदरच्या शिबिरामध्ये स्त्रीरोग-प्रसूतीशास्त्रतज्ञ ,मेडिसिन- आय.सी.यु. तज्ञ, मूत्ररोग तज्ञ डॉक्टर उपलब्ध राहणार असून सर्व
तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत स्त्रीरोग, हृदयरोग-उच्चरक्तदाब,मूत्ररोग निदान तपासणी शिबिर पार पडणार आहे.मोफत स्त्रीरोग तपासणी डॉ.दिव्यता केदार (एम.एस. स्त्रीरोग-प्रसूती शास्त्रतज्ञ )
यांचे मार्फत स्त्रीयांचे सर्व प्रकारचे आजार ,मासिक पाळीचे आजार,गरोदर स्त्री तपासणी, स्त्री-पुरुष वंध्यत्व,गर्भाशय पिशवीचे आजार इ.आजारांवर तपासणी होणार आहे
तसेच डॉ.निरंजन केदार (एम.डी.मेडिसिन )यांचे मार्फत मोफत ह्रदय रोग-उच्च रक्तदाब तपासणी, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह,दमा, थायरॉईड, श्वसनाचे आजार,पोटाचे आजार मेंदूरोग इ. आजारांवर तपासणी होणार आहे.
आणि मूत्ररोग तज्ञ डॉक्टर यांचे मार्फत मूत्ररोग,मुतखडा,प्रोस्टेट ग्रंथीची सूज,मूत्राशयाचे आजार ,किडनीचे आजार,किडनीतील खडे,मूत्रवाहिनी मधील खडे,मूत्राशयातील खडे ,
मूत्रमार्गातील खडे ,अन्य मूत्रविकार इ.या सर्व आजारांवर मोफत निदान यामध्ये तज्ञडॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे.केदार लॅबोरेटरी यांचे मार्फत मोफत हृदयाची तपासणी-इ. सी. जी.,
मोफत रक्त तपासणी-सी.बी. सी. रक्तातील हिमोग्लोबिन, साखर, रक्तगट तपासणी केली जाणार आहे.तरी सांगोला तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व गोर-गरीब गरजू रुग्णांनी दिनांक १५ मार्च ते ३० मार्च या पंधरवड्यात
खालील फोनवरती संपर्क साधून या शिबिराचा लाभ घ्यावा.असे केदार हॉस्पिटल च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.संपर्क-9145124579,8010551108
0 Comments