ब्रेकिंग न्यूज..15 मार्च पासून सांगोल्यातून आता थेट मुंबईला एक्सप्रेस रेल्वे पंढरपूर-दादर एक्सप्रेस रेल्वेचा व्हाया सांगोला-मिरज मार्गे सातारा पर्यंत विस्तार
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): पंढरपूर येथून दादर मुंबईला जाणाऱ्या दादर-पंढरपूर-दादर या एक्सप्रेस रेल्वेचा विस्तार व्हाया सांगोला, मिरज,
सांगली मार्गे सातारा पर्यंत विस्तार करण्यात आलेली रेल्वे शुक्रवार १५ मार्च पासून सुरू होणार असल्याने सांगोलाकरांना मुंबई व साताऱ्यास थेट जाण्याची सोय होणार आहे.
या बाबतचे प्रसिध्दी पत्रक मध्य रेल्वेने प्रसिद्ध केले आहे. या रेल्वेमुळे सांगोलाकरांची अनेक दिवसांपासून मुंबईला थेट जाण्याची मागणी पूर्ण होणार आहे.
ट्रेन नं. ११०२७ दादर-पंढरपूर ही गाडी आठवडयातून रविवार, सोमवार व शुक्रवारी धावणार आहे, ही रेल्वे दादर हुन रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी निघून
सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी पंढरपूर येथे पोहचेल. पुढे हीच रेल्वे, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहंकाळ, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी,
ताकारी, कराड, मसुर, कोरेगाव येथे थांबा घेत सातारा येथे दुपारी २ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. परत तीच रेल्वे ट्रेन नं. ११०२८ सातारा- दादर ही सातारा येथून ३ वाजून २० मिनिटांनी निघुन पंढरपूर येथे वरील सर्व थांबे घेवून
व्हाया मिरज, सांगोला मार्गे रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी पंढरपूर येथे पोहोचून ९ वाजून ४० मिनिटांनी दादर- मुंबई कडे कुर्डूवाडी मार्गे रवाना होणार आहे.
विस्तारीत सातारा-दादर ही रेल्वे सोमवार, मंगळवार व शनिवारी धावेल तर दादर - सातारा ही रेल्वे रविवार, सोमवार व शुक्रवारी धावणार आहे.
या विस्तारीत रेल्वे मुळे सांगोलाकरांना मुंबई, पुणे, सातारा, कराड येथे जाण्याकरिता थेट सांगोल्यातून एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
0 Comments