google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील घटना...साडे येथील तरुणाचा डोक्यात घाव घालून खून

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील घटना...साडे येथील तरुणाचा डोक्यात घाव घालून खून

 सोलापूर जिल्ह्यातील घटना...साडे येथील तरुणाचा डोक्यात घाव घालून खून


करमाळा तालुक्यातील साडे येथील रोहित राजू काळे (वय १७ ) याचा सौंदे साडे शिवेजवळ तीक्ष्ण हत्याऱ्याने डोक्यात घाव घालून खून केला. 

ही घटना (दि.२५) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, रोहित काळे हा शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला होता.

 तो परत आलाच नाही. मात्र, सकाळी सौंदे शेलगाव शिवारात त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. 

घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी रोहितची बहीण बालिका राजू काळे (वय१८) ही एसटी बसने जात असताना घटनास्थळी गर्दी दिसल्याने ती बस मधून खाली उतरली.

 तिने पाहिले असता तिचा भाऊ रोहित मृतावस्थेत तिला आढळला. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने भावाचा खून केल्याची फिर्याद करमाळा पोलिसात तिने दिली आहे. 

याबाबत करमाळा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी

 उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी भेट दिली. या खूनाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर करीत आहेत.

Post a Comment

0 Comments