google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मिरज -कुर्डूवाडी- मिरज रेल्वेस पॅसेंजरचा दर्जा व दर जाहीर.अशोक कामटे संघटनेच्या पाठपुरायला यश

Breaking News

मिरज -कुर्डूवाडी- मिरज रेल्वेस पॅसेंजरचा दर्जा व दर जाहीर.अशोक कामटे संघटनेच्या पाठपुरायला यश

 मिरज -कुर्डूवाडी- मिरज रेल्वेस पॅसेंजरचा दर्जा व दर जाहीर.अशोक कामटे संघटनेच्या पाठपुरायला यश


(सांगोला (प्रतिनिधी) शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मिरज -कुर्डूवाडी- मिरज डेमो रेल्वे कोरोना कालावधीपासून विशेष रेल्वे म्हणून धावत  होती. विशेष रेल्वे असली तरी या गाडीस एक्सप्रेस गाडीची तिकीट आकारणी होती,

 याकरिता अशोक कामटे सामाजिक संघटनेने रेल्वे बोर्ड दिल्ली यांच्याकडे ही बाब वारंवार निदर्शनास  आणून दिली. याकरिता पॅसेंजरप्रमाणे दरची आकारणी करावी किंवा या गाडीस एक्सप्रेसचे रेक जोडण्यात यावी .

अशी मागणी रेल्वेच्या संबंधित  विभागाकडे अनेक वेळा केली होती या मागणीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने दिनांक 28 फेब्रुवारी 2024 पासून सुधारित

 पॅसेंजर रेल्वेच्या दरपत्रकाची अंमलबजावणी केली आहे .त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मिरज ते कुर्डूवाडी या मार्गावर अल्पखर्चात प्रवास करता येणार आहे 

त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केलेल्या पाठपुराव्याबद्दल प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

चौकट :-शहीद अशोक कामटे संघटनेने रेल्वे विभागास कोरोना काळात सुरू रेल्वे केलेल्या संदर्भात विशेष तिकीट दर कपात करून पूर्ववत ठेवावेत

 याकरिता 27 सप्टेंबर 2022 पासूनपाठपुरावा केलेला होता त्यामध्ये परळी -मिरज या रेल्वेचाही समावेश होता केवळ कुर्डूवाडी -मिरज -कुर्डवाडी याच रेल्वेचे दर कमी करण्यात आलेले आहेत

 परळी गाडीकरिता कामटे संघटनेचा पाठपुरावा सुरू राहणार आहे .प्रवाशांच्या समस्याकरिता या पुढील काळात देखील कामटे संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.

श्री. नीलकंठ शिंदे सर ,संस्थापक :-शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना ,सांगोला.

Post a Comment

0 Comments