google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विर पत्नी वीरमाता व आजी-माजी सैनिकांचा गौरव सोहळा म्हणजे भारताच्या देशसेवेचा सन्मान-डॉ.अनिकेत देशमुख

Breaking News

विर पत्नी वीरमाता व आजी-माजी सैनिकांचा गौरव सोहळा म्हणजे भारताच्या देशसेवेचा सन्मान-डॉ.अनिकेत देशमुख

 विर पत्नी वीरमाता व आजी-माजी सैनिकांचा गौरव सोहळा म्हणजे भारताच्या देशसेवेचा सन्मान-डॉ.अनिकेत देशमुख


कोळे प्रतिनिधि:- (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

शिव हिन्दुस्तान मित्र मंडळ कोळे / कोळे ग्रामस्थ यांच्या वतीने आजी माजी सैनिकांचा वाढदिवस आणि वीरमाता व वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा संपन्न

सैनिकांचा गौरव करणे म्हणजे देश सेवेचा सन्मान करण्यासारखा आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून

 शिव हिंदुस्थान मित्र मंडळाच्या वतीने आजी माजी सैनिकांचा गौरव सोहळा आयोजित करून त्या सैनिकांच्या कर्तव्याचे स्मरण ठेवले जाते, या मंडळाच्या या

स्तुत्य उपक्रमाचे मी कौतुक करतो, असे मत डॉ. अनिकेत देशमुख यांनी व्यक्त केले.

नुकताच कोळे येथे शिव हिन्दुस्तान मित्र मंडळाच्या वतीने आजी माजी सैनिकांचा वाढदिवस आणि वीरमाता व

वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

 डॉ. पियूष साळुंखे - पाटील :-  ही देश सेवेत जवानांचे कार्य किती महत्वपूर्ण आहे हे समजावून सांगून मंडळाचे कौतुक केले.

 प्रथमता मंडळाच्या वतीने मान्यवरांचा व आजी-माजी सैन्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मान्यवरांनी भारतीय जवानांच्या देश सेवेबद्दल मनोगत व्यक्त केले.

शिव हिंदुस्तान मंडळ कोळे यांचेकडून मान्यवरांच्या हस्ते व आजी- माजी सैनिकांच्या हस्ते केक कापून आजी माजी जवानांचा 

अनोखा असा अभूतपूर्व वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी युवा नेते डॉ. पियूष साळुंखे पाटील व डॉ. अनिकेत देशमुख,

सचिन देशमुख,संभाजी आलदर व कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक कॅप्टन रावसाहेब साळुंखे अध्यक्ष आजी-माजी 

सैनिक संघटना सांगोला तालुका व प्रमुख पाहुणे माजी सैनिक कॅप्टन दिलीप यादव अध्यक्ष आजी-माजी सैनिक संघटना

 कवठेमंकाळ यांनी आपले विचार व्यक्त केले.हा सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोळे ग्रामस्थ व शिव हिंदुस्तान मंडळ कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments