उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नेत्र तपासणी व रस्तासुरक्षा शिबिर संपन्न...
सांगोला प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे
रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज मार्फत सांगोला तालुक्यातील वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर
सांगोला येथे दृष्टी नेत्रालय येथे संपन्न झाले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराची सुरुवात मोटार वाहन निरीक्षक संदीप पाटील व सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीम राया खनदाळे व नेत्रालयाचे डॉक्टर उद्धव शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
या शिबिरात एकूण 90 चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी करण्यात आलेल्या ज्या चालकांना चष्म्याची आवश्यकता आहे अशा चालकांना मोफत चष्मे वाटप उपप्रादेशिक
परिवहन कार्यालयातर्फे करण्यात येणार आहे. नेत्र तपासणी शिबिराबरोबरच मोटर वाहन निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगोला एसटी आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे चालक वाहक
यांना रस्ता सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तालुक्यातील वाढती अपघात संख्या लक्षात घेता त्यावर प्रभावी उपाययोजना म्हणून शहरातील महत्त्वाची ठिकाणे
तसेच पेट्रोल पंप व राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असणाऱ्या आस्थापना यामध्ये रस्ता सुरक्षिततेसाठी पाळावयाची अष्टसूत्री याचे स्टिकर्स संदीप पाटील यांच्या उपस्थितीत
प्रदर्शित करण्यात आले. सदर शिबिरादरम्यान सांगोला येथील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक , प्रशिक्षक व वाहन चालक-मालक प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.


0 Comments